मायलेकाचा नदीत बुडून मृत्यू, भाऊबिजेसाठी आली होती माहेरी

मायलेकाचा नदीत बुडून मृत्यू, भाऊबिजेसाठी आली होती माहेरी

सोनालीचा 5 वर्षांचा मोठा मुलगा अन्वेश घरी थांबल्याने थोडक्यात बचावला.

  • Share this:

औरंगाबाद,1 नोव्हेंबर: भाऊबीज सणासाठी माहेरी आलेल्या विवाहितेसह 3 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना धोंदलगाव (ता. वैजापूर) येथे घडली. सोनाली ऊर्फ पूनम राजू आघाम (वय-22) आणि प्रथमेश राजू आघाम (वय-3, रा. गुरुधानोरा, ता. गंगापूर, जि.औरंगाबाद ) असे मृत मायलेकाची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, सोनाली दिवाळी सणासाठी दोन दिवसांपूर्वी आपल्या दोन मुलांसह धोंदलगाव (माहेर) येथे भाऊ कृष्णा करवंदे यांच्याकडे आली होती. गुरुवारी (31 ऑक्टोबर) दुपारी सोनाली कपडे धुण्यासाठी गावाजवळच्या नदीवर गेली होती. तिच्यासोबत प्रथमेशही होता. नदीकाठावर खेळताना तो नदीत पडल्याचे लक्षात आल्यावर सोनाली यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने मायलेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांनी 30 ते 35 फूट खोलवर पाणीसाठ्यातून मायलेकांना बाहेर काढून वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. दरम्यान, सोनालीचा 5 वर्षांचा मोठा मुलगा अन्वेश घरी थांबल्याने थोडक्यात बचावला.

समृद्धी महामार्गासाठी नदीचे खोदकाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी धोंदलगाव येथील नदीतून मोठया प्रमाणावर भराव काढण्यात आल्याने खोलीकरण झालेल्या नदीपात्रात परतीच्या पावसामुळे मुबलक पाणी साठा झाला आहे.

VIDEO : सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सेनेबद्दल काय निर्णय झाला? बाळासाहेब थोरात म्हणाले...

First published: November 1, 2019, 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading