निसर्गाचा आणखी एक चमत्कार, उस्मानाबादेत चक्क बोकड देतो दूध!

निसर्गाचा आणखी एक चमत्कार, उस्मानाबादेत चक्क बोकड देतो दूध!

  • Share this:

बालाजी निरफळ,(प्रतिनिधी)

उस्मानाबाद,12 डिसेंबर: उस्मानाबाद जिल्ह्यात निसर्गाचा आणखी एक चमत्कार समोर आला आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा बावी गावातील एका शेतकऱ्याचे बोकड चक्क दूध देतो. बावी गावाचे धनंजय जगताप हे शेतकरी शेती बरोबर ते शेळी पालणाचा पुरक व्यवसाय करतात. गेली चार दिवसांपूर्वी त्याचं धर्मेंद्र नावाचं बोकड दूध देत असल्याचे त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आले. हा.. हा.. म्हणता ही वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. दूध देणारा बोकड पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक गर्दी करत आहेत. आपले बोकड दूध देऊ लागल्यामुळे आपल्यालाही सुरवातीला धक्काच बसल्याचे धनंजय जगताप यांनी सांगितले.

दूध जर काढले नाही तर ते मनाने बाहेर पडते. एवढेच नाही तर त्याला शेळीचे पिलेही पित असल्याचे बोकाडाचे मालक सांगत आहेत. धनंजय जगताप बोकड मालक शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे अपवादात्मक परिस्थितीमुळे बोकड दुध देऊ शकते, अशी चर्चा सगळे जण करत आहेत. पण गावातील लोकांना बोकड दूध देत हे पाहून एक वेगळा आनंद वाटत आहे. जगताप यांच्या गोट फार्ममधील दूध देणारा बोकड सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या बोकडाला पाहण्यासाठी गावकरी गर्दी करत आहेत.

शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे अपवादात्मक परिस्थितीमुळे बोकड दूध देऊ शकते, अशी चर्चा सगळे जण करत असले तरी 'न्यूज 18 लोकमत'ने पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता हा प्रकार आमच्यासाठीही नवीन आहे. याची माहिती घेऊनच बोलतो असे सांगितले. आता नेमके बोकड का दूध देऊ लागलंय, हे अधिकारी पाहतील व सांगतील तेव्हाच खरं कारण समोर येईल.

Published by: Sandip Parolekar
First published: December 12, 2019, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading