नांदेडजवळ 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार

नांदेडजवळ 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार

शिवारातील एका शेतात चिमुकली रडतांना सापडली. तिच्या शरीरावर जखमां होत्या. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

  • Share this:

नांदेड 27 फेब्रुवारी : अवघ्या 5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे. मुलाला निर्जनस्थळी शेतात नेऊन तिच्यावर नराधमाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथील 5 वर्षीय चिमुकली मंगळवारी सायंकाळपासुन बेपत्ता झाली होती. या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता.

प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला मात्र ती चिमुरडी सापडली नाही. बुधवारी सकाळी सोनखेड शिवारातील एका शेतात चिमुकली रडतांना सापडली. त्यावेळी तिच्या अंगावर कपडेही नव्हते. तिच्या शरीरावर जखमां होत्या. पीडित मुलीला तात्काळ शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासात उघड झाले. सध्या मुलीची प्रक्रुती स्थीर असली तरी ती काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणामुळे सोनखेड मध्ये तणाव निर्माण झाला आहे.

नवरा बायकोत भांडण, महिलेनं चिमुकल्यासह 40 फुट खोल विहिरीत केली आत्महत्या

नवी मुंबईतही घडली संतापजनक घटना

वाट चुकलेल्या असहाय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. दोन तासांमध्ये या पीडित महिलेवर दोन वेळा बलात्कार झाला. यात तीन व्यक्तिंचा सहभाग होता असं आता पुढे आलंय. 19 वर्षीच्या महिलेची नवऱ्यासोबत ताटातुट झाली होती. या महिलेला रेल्वे स्टेशनजवळ सोडण्याचा बहाणा करुन दोन घटनांमध्ये तिच्यावर तीघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. नाशिक मध्ये राहणारी पीडित महिला घाटकोपर येथे पतीसह गेली होती. लोकल पकडताना त्यांची ताटातूट झाली. त्यानंतर हा सगळ्या घटनाक्रम घडला.

न्यायालयाच्या आवारातच महिलेनं केला फैसला, वकिलांना केली मारहाण, पाहा हा VIDEO

लोकल पकडताना पतीसोबत ताटातुट झाल्यानंतर ही महिला रात्री मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरली. पुढील प्रवास कसा करायचा असा तिच्यासमोर प्रश्न होता. आणि हातात पैसे ही नसल्याने या महिलेने आपले कानातील सोन्याचे दागिने मुंब्रा येथे विकण्याचा प्रयत्न केला. कोणीच ते दागिने विकत घेण्यास तयार नसल्याने तिने एका रिक्षाचालकला विनंती केली. मात्र त्या नराधमाने महापे येथिल निर्मनुष्य ठिकाणी नेऊन बलात्कार केला आणि दागिने विकून पैसे आणतो सांगून पळून गेला.

कल्याणमध्ये स्कायवॉक झाला धोकादायक, धक्कादायक अहवाल आला समोर

आपले दागिनेही गेले आणि पैसेही मिळाले नाही म्हणून या महिलेने पुन्हा स्कुटी वरून जाणाऱ्या दोघांना जवळच्या रेल्वे स्थानकात सोडण्याची विनंती केली. मात्र या दोघांनी घणसोली रेल्वे स्थानकावर सोडण्या ऐवजी हायवे लगतच्या झाडीत नेऊन बलात्कार केला. अखेर या महिलेने घणसोली रेल्वे स्थानक गाठलं आणि इतर प्रवाशांच्या मदतीने ती ठाणे मार्गे नाशिक मधील आपल्या घरी पोहचली.

 

First published: February 27, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading