महाराष्ट्रात आणखी एक बलात्काराची घटना, अल्पवयीन मुलीला जबरदस्ती घरात ओढून अत्याचार

महाराष्ट्रात आणखी एक बलात्काराची घटना, अल्पवयीन मुलीला जबरदस्ती घरात ओढून अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

  • Share this:

बीड, 09 डिसेंबर : हैदराबात सामूहिक बलात्कार प्रकरण, उन्नाव बलात्कार प्रकरणाने देशात संतापाची लाट असतानाच बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहेत. बीड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली. आई वडील ऊसतोडणीला गेल्याने  घरात लहान भाऊ आणि बहीण, आजी आजोबांच्यासोबत होते. गावातील एका तरुणाने अल्पवयीन मुलगी रस्त्यावरवरुन एकटी जात आसतांना बळजबरीने घरात ओढून तिच्यावर बलात्कार केला.

ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यावेळी अत्याचार केल्यानंतर तिला बीड येथे  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आई-वडील इथे नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आई-वडील कारखाण्याहून गावी परतल्यानंतर पीडित मुलीला घेऊन पिपंळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा 256/ 19 कलम376 (1) (2) 506 भादवी आरोपी ज्ञानेश्वर संपत मोमीन या आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. देशात घडललेल्या बलात्काराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यात अशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

इतर बातम्या - लाईव्ह SEX पाहण्यासाठी महिलेला दिले 2 लाख, अल्पवयीन मुलीचेच केले लैंगिक शोषण

नराधम बापाचा पोटच्या मुलीवर बलात्कार, पीडिता 6 महिन्यांची गरोदर

नराधम बापाने पोटच्या सोळा वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याची संतापजनक घटना किडवाईनगर, नागांव येथे समोर आली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेप्रकरणी शनिवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल होताच नराधम बापाच्या मुसक्या पोलिसांनी आवळून त्याला पोलीस कोठडीत डांबले आहे.

महंमद कासीम अंसारी (वय-45, रा. किडवाई नगर ) असे 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाचे नाव आहे. पीडित मुलगी ही एकटीच घरात असताना वासनांधीन नराधम पिता महंमद याने मुलीवर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. दरम्यानच्या काळात मुलगी उत्तर प्रदेश येथे नातेवाईकांकडे लग्न कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी पीडित मुलीच्या मामीने तिची चौकशी केली असता सदरचा घृणास्पद प्रकार समोर आला. पीडितेकडे अधिक चौकशी केली असता आई व भाऊ, बहीण घराबाहेर गेल्यावर नराधम पिताच तिला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले.

या अमानूष घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याने अखेर नातेवाईकांनी पीडितेला धीर देऊन शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात मुलीच्या जबाबावरून भादंवि कलम 376 सह लैंगिक अपराधापासून बालसंरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,9 (ह) 10 प्रमाणे गुन्हा दाखल करून एपीआय दुर्गेश दुबे यांनी नराधम अत्याचारी महंमद अंसारी यांस तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला रविवारी भिवंडी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यास 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: beed news
First Published: Dec 9, 2019 10:04 AM IST

ताज्या बातम्या