सैनिकी विद्यालयाच्या शिक्षकाचा भरदिवसा धारदार शस्त्राने भोसकून खून

सैनिकी विद्यालयाच्या शिक्षकाचा भरदिवसा धारदार शस्त्राने भोसकून खून

बीड शहरातील सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भरदिवसा भोसकून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

बीड, 19 सप्टेंबर: शहरातील सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भरदिवसा भोसकून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बालेपीर भागात ही घटना घडली. भरदिवसा खूनाची घटना घडल्याने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपा पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सय्यद साजिद अली (वय-35) असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते सैनिक विद्यालयात शिक्षक होते. सय्यद यांचा शरीरावर धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला आहे.सय्यद यांच्या छाती आणि पोटावर वार करण्यात आले आहेत. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या सयय्द यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सय्यद यांचा खून झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली आहे. मात्र, अद्याप खूनाचे कारण अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

नातेवाईकांचा एसपी कार्यालयात ठिय्या...

आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत सय्यद यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. नातेवाईकांनी एसपी कार्यालयात ठिय्या मांडला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

VIDEO:मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला? फडणवीसांनी केला खुलासा

First published: September 19, 2019, 5:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading