रस्त्यासाठी नागरीकांचं बेमुदत 'झोपा काढा' आंदोलन, ठोकला तंबू

रस्त्यासाठी नागरीकांचं बेमुदत 'झोपा काढा' आंदोलन, ठोकला तंबू

एवढं करूनही जाग येत नसेल तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय.

  • Share this:

उस्मानाबाद 17 फेब्रुवारी : सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक पद्धतीची आंदोलने केली जातात. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळी आंदोलनं झाली आहेत. मात्र उमरगा शहरातील रस्त्याच्या प्रश्नाला घेऊन त्रस्त झालेल्या उमरगा शहरातील नागरिकांनी चक्क रस्त्यावरच बेमुदत झोपा काढो आंदोलन सुरू केले आहे. उमरगा शहरातील पतंगे रास्ता गेली अनेक वर्षांपासून खराब झाला आहे तो रस्ता दुरुस्त करावा व त्याची लांबी वाढवावी यासाठी परिसरातील नागरिकांनी नगर पालिकेला कुलूप लावून नगरपालिका बंद देखील पाडली पण निर्ढावलेले अधिकारी व पुढारी या नागरिकांच्या मागणी कडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून नगरपालिकेच्या कामाला वैतागून आज पतंगे वस्ती मधील नागरिकांनी आज पासून या रस्त्याच्या मुख्य बाजूलाच मोठा तंबू ठोकून बेमुदत झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे.

प्रशासन जो पर्यंत हा रस्ता बनवत नाही तोपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक ही बंद करत आम्ही येथेच झोपा काढणार आहोत नगर पालिका प्रशासन पूर्ण झोपी गेले आहे आता त्यांना जागे करण्यासाठी आता आम्हीच झोपा काढो आंदोलन करत असल्याचे नागरीक सांगत आहेत.

इंदुरीकर महाराजांवर उठली टीकेची झोड, मात्र भाजप आमदाराचा जाहीर पाठिंबा

गेली अनेक महिने हे नागरीक आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नव्हते. शेवटी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. या लोकांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास होतो. वाहनांनाही मोठा त्रास होतो. त्यामुळे तातडीने हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी सगळ्यांनीच आंदोलनाचा निर्णय घेतला होता.

लालपरीचं स्टेअरिंग तिच्या हाती, शुभांगी केदार पहिल्या महिली एसटी चालक

गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला जाग केव्हा येणार असा सवाल आता लोकांनी केलाय. एवढं करूनही जाग येत नसेल तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय.

First published: February 17, 2020, 4:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या