मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तिहेरी हत्याकांडानं महाराष्ट्र हादरलं! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं

तिहेरी हत्याकांडानं महाराष्ट्र हादरलं! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं

शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला.

  • Published by:  Kranti Kanetkar
बीड, 14 मे : कोरोना व्हायरसच्या महासंकटात एकीकडे माणस एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. एकमेकांना मदतीचा हात देत आधार देत असतानाच दुसरीकडे बीडमध्ये मात्र वादातून तिहेरी हत्याकांड झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. तिथे झालेल्या वादातून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मांगवडगाव इथे घडली असून तिहेरी हत्येनं बीड हादरलं आहे. मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासणी केली. जखमींला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल तर 3 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे. एकीकडे कोरोना व्हायरसमुळे वाद बाजूला ठेवून लोक मदत करत असल्याचं दिसत आहे तर बीडमध्ये रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बातमी अपडेट होत आहे हे वाचा-सुन्न करणारी बातमी! बहिणीची वरात निघण्याऐवजी घरातून निघाली भावाची अंत्ययात्रा हे वाचा-लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात, पायी घरी जाणाऱ्या 10 लोकांना बसनं चिरडलं संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: Marathwada

पुढील बातम्या