मराठा आरक्षण: ‘राज्य सरकारपुढे आता 3 पर्याय, OBCच्या आरक्षणाला धक्का नाही’

मराठा आरक्षण: ‘राज्य सरकारपुढे आता 3 पर्याय, OBCच्या आरक्षणाला धक्का नाही’

' मंत्रिमंडळाने मला मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष केले आहे. मंत्रिमंडळाला जर वाटलं अध्यक्ष बदलायचा तर माझी हरकत नाही.'

  • Share this:

नांदेड 17 सप्टेंबर: मराठा आरक्षणावर राज्य सरकारने ठामपणे आपली भूमिका कोर्टासमोर मांडली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अनपेक्षीत आहे असं मत राज्य सरकारच्या आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. आता राज्य सरकारसमोर तीन पर्याय असून OBCच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मला मंत्रिमंडळाने मराठा आरक्षण उपसमितीचा  अध्यक्ष केले आहे. मंत्रिमंडळाला जर वाटलं अध्यक्ष बदलायचा तर माझी हरकत नाही. मी प्रमाणिकपणे काम केलं.

या प्रश्नावर बुधवारी मुख्यंत्र्यांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत तीन पर्याय समोर आले आहेत.

नव्याने अध्यादेश काढायचा का?

सुप्रीम कोर्टात त्याच खंडपीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल करावी का?

आणि घटनापीठाकडे दाद माघायची का?

हे तीन पर्याय असून त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार आहे.

माकडालाही आवरला नाही सेल्फीचा मोह; तरुणाचा फोन पळवून काढले भन्नाट PHOTOS

न्यायालयात जाऊन बाजू मांडण्यासाठी भक्कम मुद्दे आहे. सर्व पक्षाचा त्याला पाठिंबा आहे ही आनंदाची बाब आहे.

सारथी संस्थेचे काम ठप्प झालेले नाही. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे काम होतं काहीचा त्यावर आक्षेप होता, त्याबद्दलही मुख्यमंत्री निर्णय घेतील.

छावा संघटनेने आंदोलन केले, आंदोलनकर्त्यांना मी भेटायला तयार होतो. पण ते रेस्ट हाऊसला आले नाही. नियोजित कार्यक्रम संपवून मी घरी त्यांना भेटलो. सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. तेव्हा वाद घालण्यात अर्थ नाही.

Covid संसर्गाच्या गतीत मोठी वाढ; 39 दिवसांत 2 वरून रुग्णसंख्या 3 कोटींच्या पार

सरकारच्या भूमीकेबद्दल संशय असेल तर संघटनांनी आपले वकील लावावे. आमचा आक्षेप नाही.कोर्टाची स्थगती ही अनपेक्षित आहे. असेच अनेक विषय सुप्रीम कोर्टात  प्रलंबित आहेत. तामिळनाडू, त्रिपूराचा विषय प्रलंबित आहे, त्यावर स्थागती नाही. त्यामुळे या विषयावर स्थगती अनपेक्षित आहे

फडणवीसांची टीका

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर पलटवार करत उत्तर दिलं आहे. मी जातीने ब्राह्मण असल्यामुळे काही लोक सगळं खापर माझ्यावर फोडत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षणाचा घोळ झाला असा आरोप भाजपने केला आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत त्यामुळे हे आरक्षण रखडलं असे काँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहेत.

फडणवीस पुढे म्हणाले, मला असं म्हणणं शोभणारं नाही, मात्र मी स्पष्टपणे सांगतो की केवळ माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्या माथी सर्व काही आरोप केले तर चालतील असं काही लोकांना वाटतं. ते मोजकेच लोकं आहेत. मात्र आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला चांगलंच माहित आहे असंही ते म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 17, 2020, 4:44 PM IST

ताज्या बातम्या