कोणी पिना, नाणे गिळतं... तरुणानं गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले चकीत

लहान मुलं खेळताना फळांच्या बिया, पिना, टिकल्या, नाणे गिळल्याचं तुम्ही ऐकलं असेल.

लहान मुलं खेळताना फळांच्या बिया, पिना, टिकल्या, नाणे गिळल्याचं तुम्ही ऐकलं असेल.

  • Share this:
औरंगाबाद, 30 डिसेंबर: लहान मुलं खेळताना फळांच्या बिया, पिना, टिकल्या, नाणे गिळल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण एका तरुणानं लांबलचक टूथब्रशच (Toothbrush) गिळाला, हे वाचून तुम्ही चकीत झाला असाल. होय, हे खरं आहे. औरंगाबाद शहरात (Aurangabad City) एका 33 वर्षीय तरुणानं चक्क टूथब्रशच गिळल्याचं समोर आलं आहे. पोटात वेदना सुरू झाल्यानं त्यानं घाटी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीत पोटात अख्खा टूथब्रश पाहून डॉक्टरही चकीत झाले. गुंतागुंतीचीशस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी टूथब्रश काढला आहे. हेही वाचा...राजकारणात नवा ट्विस्ट! आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल रविवार बाजार परिसरातील हा रुग्ण आहे. 26 डिसेंबर रोजी सकाळी दात घासताना त्यानं टूथब्रशच गिळला. पोट दुखू लागल्याने सदर रुग्ण सकाळी 11 वाजता घाटी रुग्णालयात दाखल झाला. रुग्णाची अवस्था पाहून तत्काळ उपचार सुरु झाले. उपचारासाठी रुग्णाचा सीटी स्कॅन करण्यात आला. तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. हा ब्रश कसा गिळला असेल, असा प्रश्न डॉक्टरांनाही पडला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून हा दूशब्रश पोटातून काढला. शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती स्थिर आहे. त्याला पुढील एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळेल, असंही समजतं. दीड वर्षाच्या मुलानं गिळला मोत्यांचा हार गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अशीच एक घटना समोर आली होती. दीड वर्षाच्या एका मुलानं मोत्यांचा हार गिळला होता. त्यामुळे हा हार बाळाच्या पोटातून बाहेर कसा काढायचा? हा प्रमुख प्रश्न कुटुंबीयांसमोर होता. त्यानंतर त्यांनी लखनऊमधील गोमतीनगर येथील ACADIS रुग्णालयात धाव घेतली. येथील डॉक्टरांच्या पथकाने 5 तासांच्या प्रदीर्घ प्रयत्नातून हे ऑपरेशन केलं. लखनऊमधील दीड वर्षाच्या मुलानं 65 मणी असलेला मोत्याचा हार गिळंकृत केला होता. त्यामुळं कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली ते प्रचंड अस्वस्थ झाले. काय करावं काही सुचतं नव्हतं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, डॉक्टरांनासुद्धा सुरूवातीला धक्का बसला. हेही वाचा...समझनेवाले को इशारा काफी है! संजय राऊत यांचं भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज या गुंतागुंतीचं ऑपरेशन करणाऱ्या बालरोग तज्ज्ञ डॉ. सायमा खान म्हणाल्या की हा मुलगा जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा तो सतत रडत आणि उलट्या करीत होता. जेव्हा आम्ही त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्या पोटात मोत्याचा हार असल्याचं लक्षात आलं. तसेच या मण्यांमध्ये चुंबकीय गुण होते. त्यामुळं हे ऑपरेशन खूपच गुंतागुंतीचं बनलं होत, पण शेवटी आम्ही आणि आमच्या टीमनं हे करून दाखवलं.
Published by:Sandip Parolekar
First published: