माथेफिरुने वनराईत ठेवलं विष घातलेलं अन्न, गाय, श्वान आणि अनेक मोरांचा मृत्यू

माथेफिरुने वनराईत ठेवलं विष घातलेलं अन्न, गाय, श्वान आणि अनेक मोरांचा मृत्यू

या प्रकरणी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 26 जुलै : हिरवळीने नटलेल्या डोंगररांगातील हनुमान टेकडी आणि बौद्ध लेणी परिसरात माथेफिरुने विष कालवलेलं अन्न ठीक-ठिकाणी ठेवलं आहे. ते विषारी अन्न खाऊन गाय, कुत्रे, शेळ्यांसह अनेक मोर मरण पावले आहेत. या प्रकरणी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निसर्ग रम्य ठिकाण म्हणून औरंगाबाद लेणी,बौद्ध लेणी, हनुमान टेकडी हा परिसर शहरात प्रसिद्ध आहे.याच भागातील जंगले,पाण्याचे धबधबे, पशु-पक्षी, मोरांचे नृत्य, वनराई पाहण्यासाठी शेकडो पर्यटक रोज या भागात हजेरी लावतात मात्र या भागात आता अज्ञाता कडून विष प्रयोग सुरू झाला आहे. जंगलात येणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांची जनावरे दगावत आहे. हा प्रकार मागील एक वर्षा पासून सुरू आहे.

राज्यात आणखी एका जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन शिथिल, उद्यापासून नियम असे असतील नियम

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तरुणाने दिला संदेश, सगळ्यांनी दिल्या शुभेच्छा

हनुमान टेकडी बौद्ध लेणी परिसरातील झुडुपांमध्ये ठीक- ठिकाणी थायमेंट नावाचे कीटनाशक मिसळलेले अन्न ठेवण्यात आले आहे.सुमारे 30 ते 40 ठिकाणी ठेवलेले विष ग्रामस्थांनी उचलून नष्ट केले होते त्यानंतर आज पुन्हा एक गाय,चार शेळ्या, दोन कुत्रे, आणि चार मोर मृत अवस्थेत परिसरात आढळून आले.

कारगिल विजय दिवशीच महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण, काश्मीर खोऱ्यात गमावला प्राण

यामुळे परिसरातील ग्रामस्था मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी भन्ते सत्यदिपजी यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 26, 2020, 9:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या