औरंगाबाद, 1 जानेवारी: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दौलताबाद किल्ल्यासमोर भीषण अपघात झाला आहे. कार विहिरीत पडून दोन ठार तर 3 जखमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री 2 वाजताची घटना घडली. थर्टीफस्टची पार्टी करुन घरी जाताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, नवीन वर्षाचे स्वागत करुन घरी परतताना झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दौलताबाद किल्ल्यासमोर मध्यरात्री ही घटना घडली. या अपघातात कार विहिरीत कोसळली. यामध्ये दोन ठार तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सौरभ नांदापूरकर (वय-29, रा.रा रोकडे हनुमान कॉलनी), विरभास कस्तुरे (वय-34, रा.पुंडलिक नगर) असे दोन्ही मृत मुलांची नावे आहेत. तर नितीन शिशीकर (वय- 34), प्रतिक कापडीया (वय-30), मधूर जयस्वाल (वय- 30) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. विहिरीत पडलेली कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली आहे.
'द' दारूचा नव्हे दुधाचा.. म्हणत पुण्यात पोलिसांनी असं केलं नववर्षाचं स्वागत
दुसरीकडे, सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याचा पायंडा अलिकडच्या काळात रुढ झाला आहे. यामुळे विशेषत: तरुणाईमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आबे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील देहूरोड पोलिसांनी हीच बाब लक्षता घेवून 31 डिसेंबरला 'दारू सोडा आणि दूध प्या', असा मोलाचा सल्ला दिला. देहूरोड शहरातील सवाना चौकात व्यसनमुक्त समाज निर्मितीबाबत नवीन वर्ष मद्यपान करून साजरा करणाऱ्या तरुणाईला व्यसनाच्या आहारी न जाता सुदृढ आरोग्य लाभावे. यासाठी जनजागृती करत मसाला दुधाचे वाटप केले.देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या पुढाकाराने ही संकल्पना अमलात आली. मद्यपान करून वाहन चालवताना घडणाऱ्या संभाव्य धोक्याची माहिती तसेच दारूमुळे होणारे तोटे याची माहिती पोलिसांकडून या वेळी देण्यात आली. ऐरव्ही कारवाईच्या माध्यमातून मनात धडकी भरवणारे पोलीस नागरीकांना रस्त्यावर दूध पाजताना दिसत असल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पोलिसांकडून अनोख्या पद्धतीने साजरा होणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत तरुण पिढीनेही मोठ्या उत्साहात तसेच आनंदात केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.