ठाकरे सरकारमधले आणखी एक मंत्री COVID-19 पॉझिटिव्ह

ठाकरे सरकारमधले आणखी एक मंत्री COVID-19 पॉझिटिव्ह

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व योग्य ते उपचार घेऊन ‘होम क्वारंटाइन’ व्हावं असं आवाहनही अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद 21 जुलै: राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकारमधले (Cm Uddhav Thackeray) आणखी एक राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. सत्तार यांनीच ही माहिती दिली आहे. सत्तार यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी आपली टेस्ट करून घेतली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. काळजीचं कारण नाही. प्रकृती चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनीच आपली चाचणी करून घ्यावी असं आवाहनही सत्तार यांनी केलं आहे.

कोरोनाच्या काळात मदत कार्यासाठी बाहेर जाणं होतं आहे. त्यावेळी कोरोनाची बाधा झाली असेल.परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व योग्य ते उपचार घेऊन ‘होम क्वारंटाइन’ व्हावं असं आवाहनही अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

या आधीही काही मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली होती. ते सर्व मंत्री त्यातून बरे होऊन पुन्हा आपल्या कामाला लागले आहेत.

पुण्यात COVID केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यानेच महिलेचा विनभंग केल्याचं उघड

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus maharashtra updates) संसर्ग कमी झालेला नाही, पण बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत 8369 नव्या Covid रुग्णांचं निदान झालं आहे, तर 246 जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 7188 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 27 हजार 31 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,276 वर गेला आहे.

मुंबईतून आली चिंताजनक माहिती; आपल्याला कोरोना झाला हे 36% लोकांना माहितीच नाही

Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. त्यानंतर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. मृत्यूदर फारसा वाढलेला नाही , हा त्यातल्या त्यात दिलासा म्हणावा लागेल. आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1,82,217 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 21, 2020, 10:59 PM IST

ताज्या बातम्या