शेवटची प्रचारसभा संपताच यामुळे पंकजा मुंडेंना आली भोवळ, स्टेजवरच कोसळल्या

शेवटची प्रचारसभा संपताच यामुळे पंकजा मुंडेंना आली भोवळ, स्टेजवरच कोसळल्या

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,19 ऑक्टोबर: परळीत शेवटची प्रचार सभा संपल्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भोवळ आली. पंकजा स्टेजवरच कोसळल्या. यामुळे एकच खळबळ उडाली. पंकजा यांना उपचारासाठी तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पंकजा सकाळपासून उपाशीपोटी होत्या.

मिळालेली माहिती अशी की, परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात शनिवारी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली. प्रचाराचा शेवटच्या दिवस असल्याने पंकजा मुंडे यांनी दिवसभर सभा घेतल्या. मतदार संघात प्रवास केला. परळीच्या शेवटच्या सभेत पंकजांनी 45 मिनिटांचे भाषण ठोकले. भाषण संपताच पंकजांना भोवळ आली आणि त्या स्टेजवरच कोसळल्या. कार्यकर्ते आणि उपस्थित महिला नेत्यांनी त्यांची विचारपूस केली. पंकजा यांना पाणी देण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी वेळीच सुरक्षारक्षक धावून आले.

पंकजा मुंडे यांच्या शनिवारी एकूण सात सभा होत्या. ही सभा त्यांची शेवटची सभा होती. पंकजा मागील 15 दिवसांपासून प्रचार कामात व्यस्त आहेत. दिवस-रात्र प्रवास आणि झोप कमी यामुळे पंकजा यांना भोवळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पंकजा यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखे नाही, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान,शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहे. परळी मतदार संघात पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात काट्याची लढत आहे.

धनंजय मुंडेंनी 'राम-लक्ष्मण'ची जोडी फोडली...

स्व.गोपीनाथ मुंडे आणि स्व.पंडित अण्णा मुंडे या 'राम-लक्ष्मण'ची जोडी फोडण्याचे काम धनंजय मुंडेंनी केल्याची घणाघाती टीता पंकजा मुंडे यांनी केली आहे. मुंडे साहेबांच्या वाईट काळात सोडून गेलात, जनता कधीच माफ करणार नाही. माझ्यावर आरोप करतात की, साहेबांना सोडून गेलेल्यांना ताई भाजपमध्ये घेतात तुम्ही साहेबांना सोडून कोणाला जावून मिळालात? पंकजा यांना कधी क्षमा करू नको, मुंडे साहेबांनी वचन घेतल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

साहेबांचे सोडा तुमचे वडील पंडित अण्णांवर काय वेळ आणली तुम्ही. राष्ट्रवादीत अगोदर पाठवलं वार झेलण्यासाठी ते पराभूत झाल्यानंतर ज्या अण्णाचे राजकारणात लोक जोड्यासहीत पाया पडत होते. मुंडे साहेबांच्या बरोबरीने समजत होते. एव्हढंच नाही तर स्व.गोपीनाथ मुंडे आणि स्व.पंडित अण्णा मुंडे या राम लक्ष्मणाची जोडी तुम्ही फोडली. आणि नाव घेता माझे असे म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेवर निशाणा साधला.

परळी येथील गणेशपार भागात पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ उदयनराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते. या सेभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उदयनराजे भोसले, खासदार प्रितम मुंडे, महादेव जानकर, यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्या म्हणल्या की, राष्ट्रवादीचा नायनाट करणे हे माझ्या हातूनच होणार आहे. काल माझ्या भावाने माझ्याविरुद्ध खूप घाणेरडे भाषण केले? आणि मी कितीही नाही बोलायचे म्हटले तरी मला बोलण्यास मजबूर करत आहेत. राष्ट्रवादी वाले इतके वाईट बोलतात की, माणसाने कानात गंगाजल टाकावे इतके यांचे विचार घाणेरडे आहेत. कालपासून सारखं भाषण करत आहेत, की ताईनी सुरेश धसपासून ते अक्षय मुंदडापर्यंत सेटलमेंट केली. धनंजय मुंडे नेमकं तुम्हाला म्हणायचंय तरी काय ? असा सवाल ही पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केला. त्या म्हणाल्या, मला एकवेळा निवडून येऊद्या, मग बघू..अशा शब्दांत धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंनी सुनावले आहे.

VIDEO: अमृता फडणवीसांनी जाहीर केला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचा निकाल, म्हणाल्या...

First published: October 19, 2019, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading