उदयनराजे भोसलेंनी परळीत पुन्हा उडवली कॉलर, केला 'हा' गौप्यस्फोट

याद राखा गाठ माझ्याशी आहे, उदयनराजे भोसले यांचा विरोधकांना इशारा...

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 07:29 PM IST

उदयनराजे भोसलेंनी परळीत पुन्हा उडवली कॉलर, केला 'हा' गौप्यस्फोट

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,18 ऑक्टोबर: कॉलर उडवत एक भाऊ निघून गेला तर काय झालं, हा भाऊ तुमच्यासोबत आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांना देत भाजपचे नेते आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची तोफ डागली. मी कोणाचा विश्वासघात केला नाही तर त्यांनीच माझा विश्वासघात केल्याचा गौप्यस्फोट उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस जरी एकवटून परळीत आली तरी पंकजा मुंळेंच्या कमळाला कोणी अडवू शकणार नाही. एक भाऊ गेला तर काय झाले हा भाऊ तुमच्यासोबत आहे, असे म्हणत सभेत कॉलर उडवत एक बार मैने कमिटमेंट की तो मै अपने आप की भी नही सूनता, असे म्हणत त्यांनी याद राखा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.

परळी येथील गणेशपार भागात पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ उदयनराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, महादेव जानकर उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, की मी कोणाचा विश्वासघात केला नाही तर त्यांनी माझाच विश्वास मोडला. धनंजय मुंडे यांचे नाव न घेता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या अडचणी सोडवून देखील कोणी विश्वासघात केला? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी यावेळी केला. उदयनराजे भोसले आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले की, माझ्या बहिणीला निवडून देण्यासाठी एक बार जो मैने कमिटमेंट कर ली तो मै अपनी आप की भी नही सूनता, असा पुनराच्चार केला. यावेळी पंकजा मुंडे यांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

दरम्यान, 'विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा. तसंच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत,' अशी मागणी परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती नव्हे त्यांच्या तोंडाला जॅमर बसवा, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

Loading...

प्रदीप शर्मांसाठी उद्धव ठाकरेंची सभा, वसईतून हितेंद्र ठाकूरांना दिला थेट इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...