भाजपच्या या दोन बंडखोर नेत्यांनी वाढवली जयदत्त क्षीरसागरांची डोकेदुखी

भाजपच्या या दोन बंडखोर नेत्यांनी वाढवली जयदत्त क्षीरसागरांची डोकेदुखी

बीड मतदारसंघात शिवसेनेसमोर भाजपच्या बंडखोर दोन नेत्यांचे 'बंड' थंड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,6 ऑक्टोबर: बीड मतदारसंघात शिवसेनेसमोर भाजपच्या दोन बंडखोर नेत्यांचे 'बंड' थंड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. भाजपच्या दोन नेत्यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे नेते राजेंद्र मस्के आणि अॅड.गोविंद नवनाथ शिराळे यांना बंडोखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काका-पुतण्याच्या आरोप प्रत्यारोपाने चर्चेत असेलेल्या बीड मतदारसंघात शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या समोर मित्रपक्ष भाजपमधील बंडखोर नेत्यांना रोखण्याचे मोठे आव्हान आहे. यात भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांचे जयश्री मस्के यांचे पती राजेंद्र मस्के यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर भाजपच्या माजी प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ शिराळे यांचे चिरंजीव अॅड. गोविंद नवनाथ शिराळे यांनी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी (7 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, उमेदवारी मागे घेतली जाणार नाही, असा पवित्रा या दोन्ही नेत्यांनी घेतला आहे. यात बीड मतदार संघातील भाजपच्या पदाधिकारी यांनी शिवसेनेविरोधात पवित्रा घेतला आहे.

गेवराईमधील शिवसेनेच्या बदामराव पंडित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपच्या विद्यमान आमदारची जागा धोक्यात आली आहे. त्यामुळे बीडमध्ये सध्या तरी शिवसेनाविरुद्ध भाजप असे चित्र आहे. भाजपचे नेते राजेंद्र मस्के यांनी मतदार संघात प्रचार दौरा सुरु केला आहे. तर अॅड. गोविंद शिराळे यांनी शहरात आपले नेटवर्क मजबूत करत प्रचार सुरु केला. बीड शहरातील संपर्क आणि संस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले गोविंद शिराळे आतापर्यंत जयदत्त क्षीरसागर यांच्या कुठल्याच व्यासपीठावर गेले नाही. यामुळे भाजपचा हा पवित्रा सध्या तर बीडमधील शिवसेनेची डोकेदुखी ठरणार आहे. प्रत्यक्ष यामुळे विरोधकांना फायदा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

VIRAL VIDEO:व्यसनानं केला घात! पोलीसच निघाला अट्टल चोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 07:12 PM IST

ताज्या बातम्या