Elec-widget

..नाही तर नागडं करायला अजिबात वेळ लागला नसता, या राज्यमंत्र्यांची घसरली जीभ

..नाही तर नागडं करायला अजिबात वेळ लागला नसता, या राज्यमंत्र्यांची घसरली जीभ

आमच्यामुळे, राज्य सरकारमुळे तुमची जी काही इज्जत आहे ती झाकलेली आहे. नाही तर नागडं करायला अजिबात वेळ लागला नसता, अशा शब्दात शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर घणाघाती टीका केली.

  • Share this:

जालना, 19 सप्टेंबर: आमच्यामुळे, राज्य सरकारमुळे तुमची जी काही इज्जत आहे ती झाकलेली आहे. नाही तर नागडं करायला अजिबात वेळ लागला नसता, अशा शब्दात शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर घणाघाती टीका केली.

जालना येथे एका वळण रस्त्याच्या चौपदरीकरण आणि सिमेंट काँक्रेटीकरणाच्या उद्घाटन समारंभात राज्यमंत्री अर्जुन खोतकर बोलत होते. यावेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर घणाघाती टीका केली. मला असे वाटतेय जे आपल्यावर टीका टिप्पणी करतात, यांनी काय केले तर त्यांच्या डोळ्यांत काजळ तरी घाला तुम्ही थोडासा, तुमची इज्जत फक्त आमच्यामुळे वाचली आहे. आम्ही जे गावात रस्ते केलेत ना सिमेंटचे तेच तुमची इज्जत वाचवायले नसता तुमचे रस्ते बघा काय आहे ते, काय अवस्था झाली आहे ते. त्यामुळे जे गप्पा मारतात त्यांनी लक्षात घ्यावे की, आमच्यामुळे, राज्य सरकारमुळे तुमची जी काही इज्जत आहे ती झाकलेली आहे, नाही तर नागडं करायला अजिबात वेळ लागला नसता, अशी घणाघाती टीका खोतकरांनी केली.

खोतकर-दानवेंच्या युतीचे 'ढोल बाजे ढोल'

दरम्यान, आराध्य दैवत गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. जालन्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांनी ढोल वाजवत गणेश भक्तांचा उत्साह वाढविला. यावरून शिवसेना-भाजप युती सोबतच खोतकर-दानवेंच्या युतीचे 'ढोल बाजे ढोल' अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. एवढेच नाही तर दंड थोपटत लोकसभा निवडणुकीत दानवेंचा पराभव करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती. त्यामुळे जालना जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप होऊन राज्यपातळीपर्यंतचे राजकीय समीकरणे बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. परंतु, अनेक नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यापातळीवर दानवे आणि खोतकरांचे 'मनोमिलन' घडविण्यात आले होते. लोकसभेतील दानवे यांच्या विजयात खोतकरांसह शिवसैनिकांचा मोलाचा वाटा नाकारता येत नाही. राज्यात विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून सध्या तरी सेना-भाजप युती कायम असल्याचे चित्र आहे. मात्र, जागावाटप आणि मेगाभरतीमुळे मतदारसंघ आदलाबदलीवरून सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान युती विभक्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जालन्यात सध्या खोतकर आणि दानवे 'ढोल बाजे ढोल' म्हणत युतीचे ढोल वाजवत असले तरी भविष्यात सेना-भाजपत काडीमोड झाल्यास हीच मंडळी एकमेकांची ढोल फोडताना दिसणार का..? हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

Loading...

VIDEO:ठेवीदार भडकले, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाला भररस्त्यावर बेदम चोपले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...