भाजपची ही जागा धोक्यात? शिवसेनेच्या या बड्या नेत्याने उपसले बंडाचे हत्यार

'साहेब मला माफ करा, मला माझं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवावीच लागेल. गुलाल घेऊनच परत तुमच्याकडे येईल, आज मला फक्त आशिर्वाद द्या. त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय'

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 07:49 PM IST

भाजपची ही जागा धोक्यात? शिवसेनेच्या या बड्या नेत्याने उपसले बंडाचे हत्यार

बीड,3 ऑक्टोबर: गेवराई शिवसेनेचे बडे नेते माजी मंत्री बदामराव पंडित यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. बदामराव पंडित यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून गुरूवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गेवराई शहरातील निघालेल्या रॅलीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपची जागा धोक्यात आल्याचा दावा करत 'मातोश्री'चा आशीर्वाद घेऊन लढण्याचा निर्धार केल्याचे बदामराव पंडित यांनी यावेळी सांगितले.

'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेवून 'साहेब मला माफ करा, मला माझं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवावीच लागेल. गुलाल घेऊनच परत तुमच्याकडे येईल, आज मला फक्त आशिर्वाद द्या. त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय', अशी ठाम भूमिका बदामराव पंडित यांनी शिवसेना पक्ष प्रमुखासमोर घेतली.

गेवराई विधानसभा मतदारसंघातून शिवेसनेकडून बदामराव पंडित यांनी उमेदवारी मागीतली होती. मात्र, पंडित यांना उमेदवारी नाकारुन ही जागा भाजपला सोडण्यात आली. येथे भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार निवडणूक लढविणार आहेत. बदामराव पंडित यांनी तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी चार जिल्हा परिषद जागाही मिळवल्या होत्या. गेवराई मतदारसंघाचे त्यांनी 3 वेळा प्रतिनिधीत्त्व केले आहे. पूर्वी 1995 ला अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली होती. त्यावेळी विजय मिळवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा पुनरावृत्ती करणार का? अशी चर्चा सुरु आहे.

अशी होईल चौरंगी लढत...

विद्यमान आमदार लक्ष्मण पवार (भाजप)

Loading...

विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)

बदामराव पंडित (अपक्ष)

विष्णू देवकते (वंचित बहुजन आघाडी)

एकनाथ खडसेंबद्दल शरद पवारांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 05:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...