युतीचे भिजत घोंगडं.. यादी जाहीर होण्याआधीच शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्यांची बंडखोरी

युतीचे भिजत घोंगडं.. यादी जाहीर होण्याआधीच शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्यांची बंडखोरी

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा झाली असली तरीही अद्याप शिवसेना आणि भाजपच्या युतीचे भिजत घोंगडे आहे. बीडमध्ये शिवसेना-भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याअगोदरच शिवसेनेच्या बड्या नेत्यांने बंडखोरी केली आहे.

  • Share this:

बीड,29 सप्टेंबर: कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा झाली असली तरीही अद्याप शिवसेना आणि भाजपच्या युतीचे भिजत घोंगडे आहे. बीडमध्ये शिवसेना-भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याअगोदरच शिवसेनेच्या बड्या नेत्यांने बंडखोरी केली आहे. अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

गेवराईत भाजप-सेनेत तिकिटावरून खेचाखेची...

सेना-भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याअगोदरच बीड जिल्ह्यातील एक बड्या नेत्याची क्लिप व्हायरल झाली आहे. कार्यकर्त्याला हा नेता आपण अपक्ष लढणार असल्याचे सांगत आहे. यामुळे बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. तर यादी जाहीर झाल्यानंतर अनेक जण बंडाचे निशाण फडकवण्याच्या तयारी आहेत. शिवसेना- भाजपच्या महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला जाऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेकडून बंडखोरी करण्याची तयारी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी सुरु केली असून तसा निरोप त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

बदामराव पंडित यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला मोबाइलवरुन बोलतानाची ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. त्यात त्यांनी आपल्याला तिकिट मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही ऑडिओ क्लिप गेवराईत प्रचंड व्हायरल झाली आहे. गेवराईत भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे प्रमुख दावेदार आहेत.

माजी मंत्री बदामराव पंडित 1995, 1999 आणि 2009 च्या निवडणुकीत अनुक्रमे अपक्ष आणि राष्ट्रवादीकडून विजयी झालेले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सुमारे 45 हजार मताने पराभव झालेला होता. जिल्हा परिषद निवडणूक 2017 च्या वेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन गेवराईत 4 जागा जिंकल्या होत्या. आता गेवराईत राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित, भाजपकडून आमदार लक्ष्मण पवार आणि अपक्ष म्हणून बदामराव पंडित यांच्यात लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र,

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बदामराव एका कार्यकर्त्यांला उद्देशून म्हणतात की 'आपल्याला तिकिट मिळालं नाही बरका! आता आपल्याला अपक्ष लढावे लागेल. सांग तसं तू सर्वांना...' असे म्हणून बदामराव पंडितांना आपल्या कार्यकर्त्याला कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत..

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

First published: September 29, 2019, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading