आज 'सत्तार' आमच्यासोबत, उद्या 'सत्ता' हातात असेल- उद्धव ठाकरे

आज 'सत्तार' आमच्यासोबत, उद्या 'सत्ता' हातात असेल- उद्धव ठाकरे

शेवटी वाघ हा एकटा लढून जिंकत असतो असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरांवर डागली तोफ...

  • Share this:

औरंगाबाद,13 ऑक्टोबर: शिवसेना पहिल्यांदाच सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले विद्यमान आमदार अब्दुल सत्तार हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सिल्लोडमध्ये जाहीर सभा घेतली. आज सत्तार आमच्यासोबत आहेत, उद्या सत्ता आपल्या हातात असेल, अशी गर्जना उद्धव यांनी केली. शेवटी वाघ हा एकटा लढून जिंकत असतो असे सांगत शिवसेनेतील बंडखोरांवर उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.

अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे काँग्रेसच्या तिकीटावर झालेले विद्यमान आमदार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत काँग्रेसला रामराम ठोकला होता. यानंतर विधानसभेसाठी ते भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान अब्दुल सत्तार यांनी मोठे शक्तीप्रदर्शनही केले होते. मात्र, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे अब्दुल सत्तारांनी यांनी 'ग्रीन सिग्नल' मिळू शकला नाही. अखेर अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'शिवबंधन' बांधले. अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, 2014 पर्यंत सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होता. मात्र, यावेळी तो शिवसेनेला सोडण्यात आला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची लाट असताना अब्दुल सत्तार यांनी विजयश्री खेचून आणली होती.

आमदारकी दिली तरीही झाले गद्दार, उद्धव ठाकरेंचा या नेत्यावर 'प्रहार'

उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत नाव न घेता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'गद्दारी भिनलेले कुटुंब.. आमदारकी दिली तरीही गद्दार झाले. सगळं आपल्याच घरात अशी त्यांची मानसिकता आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खासदार चिखलीकर यांच्यावर प्रहार केला आहे.

औरंगाबादमध्ये थोडी गडबळ झाली आणि हिरवा फडकला. आता नांदेडमध्ये हिरवा फडकू देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले. आमच्या वचननाम्यावर टीका होते. टीका कोण करते तर शरद पवार. 10 रुपयांत जेवण देणार पण त्या जेवणात काँग्रेस-राष्ट्रवादीवाले विरोधाचे खडे टाकत आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे फोटो लावून कामाची जाहिरात केली जाते. त्याकामात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. जे मुद्दे पटले नाही त्याला विरोध केला. शिवसेना सत्तेला बांधील नाही. शिवसेना लोकांना बांधील आहे, असे उद्धव यांनी आपल्या भाषणात सांगितले.

VIDEO : 40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 09:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading