गद्दारी भिनलेलं कुटुंब.. आमदारकी दिली तरीही झाले गद्दार, उद्धव ठाकरेंचा 'प्रहार'

गद्दारी भिनलेलं कुटुंब.. आमदारकी दिली तरीही झाले गद्दार, उद्धव ठाकरेंचा 'प्रहार'

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

  • Share this:

मुजीब शेख,(प्रतिनिधी)

नांदेड,13 ऑक्टोबर- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'गद्दारी भिनलेले कुटूंब.. आमदारकी दिली तरीही गद्दार झाले. सगळं आपल्याच घरात अशी त्यांची मानसिकता आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खासदार चिखलीकर यांच्यावर प्रहार केला आहे.

औरंगाबादमध्ये थोडी गडबळ झाली आणि हिरवा फडकला. आता नांदेडमध्ये हिरवा फडकू देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले. आमच्या वचननाम्यावर टीका होते. टीका कोण करते तर शरद पवार. 10 रुपयांत जेवण देणार पण त्या जेवणात काँग्रेस-राष्ट्रवादीवाले विरोधाचे खडे टाकत आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे फोटो लावून कामाची जाहिरात केली जाते. त्याकामात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. जे मुद्दे पटले नाही त्याला विरोध केला. शिवसेना सत्तेला बांधील नाही. शिवसेना लोकांना बांधील आहे, असे उद्धव यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आज 'सत्तार' सोबत आहेत, उद्या हातात 'सत्ता' असेल..

उद्धव ठाकरे हे आज उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारसभेसाठी सिल्लोडमध्ये सभा घेत आहेत. आज आपल्यासोबत सत्तार आहे उद्या आपल्या हातात सत्ता येईल असे ते यावेळी म्हणाले. शेवटी वाघ हा एकटा लढून जिंकत असतो म्हणत शहरातील बंडखोरांना लगावला टोला. शिवसेना पहिल्यांदाच सिल्लोड मतदारसंघ लढवत आहे

अब्दुल सत्तार यांच्यामार्फत शिवसेना पहिल्यांदाच सिल्लोड मतदारसंघ लढवत आहे. अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे काँग्रेसच्या तिकीटावर झालेले विद्यमान आमदार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर विधानसभेसाठी ते भाजप पक्षात येऊ इच्छित होते. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवेळी सत्तार यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे अब्दुल सत्तारांनी अखेर शिवबंधन बांधले. 2014 पर्यंत सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होता. मात्र यावेळी तो शिवसेनेला सोडण्यात आला आहे.

VIDEO:पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading