एकदा घरोबा केला की सारखंसारखं कुंकू बदलायंच नसतं, पवारांचा क्षीरसागरांवर हल्लाबोल

एकदा घरोबा केला की सारखंसारखं कुंकू बदलायंच नसतं, पवारांचा क्षीरसागरांवर हल्लाबोल

बीड शहरात काकाविरुद्ध पुतण्या अर्थात जयदत्त क्षीरसागरविरुद्ध संदीप क्षीरसागर अशी काट्याची लढत होत आहे.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,16 ऑक्टोबर: घरोबा एकदाच करावा लागतो. सारखं सारखं असं कुंकू बदलायंच नसतं त्यांच्यासोबतच प्रामाणिक रहायचं असतं, घरोबा करुन जर प्रामाणिकपणा सोडला तर त्याला लोक काय म्हणतात मी सांगत नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागरांवर खोचक टीका केली. शरद पवार बीडच्या जाहीर सभेत बोलत होते. त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टीका करून त्यांचा खरपूस समाचार घेतला.

बीड शहरात काकाविरुद्ध पुतण्या अर्थात जयदत्त क्षीरसागरविरुद्ध संदीप क्षीरसागर अशी काट्याची लढत होत आहे. संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार उषा दराडे, सय्यद सलीम, राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद एक वेळा नाही तर तीन वेळा दिले. ज्यामधून बीड जिल्ह्याचा विकास अपेक्षित होता. स्व. केशर काकूने हयातीत विचाराची साथ कधीच सोडली नाही. त्या प्रामाणिक राहिल्या त्यांचा आज सन्मान होतो. मात्र, दुसरी पिढीला काकू पेक्षा जास्त सगळं मिळालं, सत्ता, पद दिले तरी सांगतात की गुदमरल्याने होतं म्हणून तिकडच्या घरी गेलो. तीन वेळा मंत्री होऊन गुदमरत का? असा प्रश्न उपस्थित करत सारखं सारखं कुंकू बदलायचं नसतं. घरोबा एकदाच करावा लागतो. कुंकू बदललं की त्याला लोक काय म्हणतात ते सांगत नाही, असे म्हणत पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांचा खरपूस समाचार घेतला. ज्यांच्यासाठी साथ दिली त्यांनी भलत्या घरात प्रवेश केला. या वयात घर बदलायची सवय असेल त्यांना जागा दाखवा आणि त्यांची जागा तुम्ही घ्या. शब्दांला जागणारी पिढी हे बीडचे वैशिष्ट होते. त्यावेळी अभिमानाची भावना होती. मला नवीन नेतृत्त्वाची फळी उभी करायची ही जी भूमिका घेतलीय त्याला बीडमध्ये पाठिंबा मिळाला. या भूमिकेचा पहिला घटक हा संदीप क्षीरसागर असेल. सत्तेत असतांना अनेकांना शक्ती दिली पण त्यांनी स्वत: चे कल्याण करुन दुष्काळी जिल्ह्यासाठी सत्तेच्या खूर्चीचा लाभ लोकांना मिळावा, यासाठी व्हायला हवा होता. मात्र, तो झाला नाही.

काकूचा स्वाभीमान आणि निष्ठेची परंपरा जोपासली मतांचा विक्रम करा. परिवर्तन करायंचा यासाठी घरोघरी फिरा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात पोचवा. सगळ्यात जास्त मतांनी संदीप क्षीरसागर निवडूण येईल, इतिहास घडवा, असे आवाहन शरद पवार यांनी केले. पुढचे पंचवीस वर्षे नेतृत्त्व करणाऱ्याच्या हाताना बळ द्या, असेही पवारांनी यावेळी सांगितले.

VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली, म्हणाले...

Published by: Sandip Parolekar
First published: October 16, 2019, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading