नागपूर बनली 'क्राईम सिटी', मुख्यमंत्र्यांना मत मागण्याचा अधिकार नाही; पवारांचा घणाघात

नागपूर बनली 'क्राईम सिटी', मुख्यमंत्र्यांना मत मागण्याचा अधिकार नाही; पवारांचा घणाघात

ज्यांना आम्ही एक वेळा मंत्री केलं दोनवेळा मंत्री केलं तीन वेळा मंत्री पदाची संधी दिली ते जयदत्त क्षीरसागर पक्ष सोडून गेले. कारण विचारले तर सांगतात म्हणे विकास करायचा...

  • Share this:

बीड,17 सप्टेंबर:राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे बीडमधील राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पवारांनी यात तरुण चेहऱ्यांना संधी देत नवी खेळी केली आहे. यात बीडमध्ये संदीप क्षीरसागर, गेवराई-विजयसिंह पंडित, केज-नमिता मुंदडा तर परळी-धनंजय मुंडे, माजलगावमधून-माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना संधी दिली आहे. या वेळी पवारांनी बीडमधील पक्ष सोडून गेलेल्यावर सडकून टीका केली.

'ज्यांना आम्ही एक वेळा मंत्री केलं दोनवेळा मंत्री केलं तीन वेळा मंत्री पदाची संधी दिली ते जयदत्त क्षीरसागर पक्ष सोडून गेले. कारण विचारले तर सांगतात म्हणे विकास करायचा. पंधरा वर्षे मंत्री होते तेव्हा विकास केला नाही का?' असा टोला लगावला. पुढे बोलताना महाराष्ट्रात वेगळंचित्र दिसते..नवी पिढी शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. सत्ता दिली त्यांनी शेतकरी हिताचा कार्यक्रम राबवला नाही. राज्यांत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कष्टानं पिकवंल पदरात पडलं, पण घामाची किंमत मिळाली नाही. बँकेचे कर्ज फेडता आले नाही. म्हणून आत्महत्या करत आहे.

भाजप सरकाने कर्ज माफी ऑनलाईन केली, प्रत्यक्षात लाभ किती लोकांना मिळाला, याबाबत चौकशी केली, तेव्हा 40 टक्केच लोकांना लाभ मिळला 60 टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज तसेच आहे. नोकरी नाही बेरोजगारांची संख्या वाढली रोजगारसाठी केंद्रे आणि राज्य सरकारने पाऊले टाकले नाहीत. म्हणून तरुणवर्गात नैराश्य आहे. महाराष्ट्रात बेरोजगारांची भयानक परिस्थिती आहे. आमच्याकडे सत्ता होती. तेव्हा कारखाने आणून रोजगार निर्मान केला.

देशात सर्वात जास्त मुंबई कापड तयार करणारे शहर म्हणून ओळख होती. आज मुंबईत 120 गिरण्या पैकी 114 गिरण्या बंद आहेत. यामुळे तब्बल दीडलाख लोकांचे रोजगार गेले. फक्त 14 हजार लोक काम करतात. लाख लोक बेकार झाले आहेत. मुंबईत औषधाला मराठी माणूस पाहायला मिळत नाही, असे पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना टोला...

Loading...

भाजप सरकारच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत काम केलेच नाही मग त्यांना मत मागण्याचा काय अधिकार आहे.? पाच वर्षांत प्रत्येक गोष्टीला ज्यांनी अपयश आणले. त्यांच्यात हातात सरकार द्यायचे नाही, ज्या ठिकाणी मुख्यंमत्री राहतात त्या नागपूर शहरात सगळ्यात जास्त गुन्हेगारी आहे. नागपूरची आज 'क्राईम सिटी' म्हणून ओळख आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

जयदत्त क्षीरसागरांवर टीका...

काही लोकांना उपरती आली पक्ष सोडून जात आहेत का? पक्ष सोडता असं विचारलं तर विकासासाठी तिकडे जातो मला त्यांना सांगायचं बीडमधील दोन जण गेले. मला आठवतं जयदत्त क्षीरसागर यांना राज्यमंत्री कोणी केले.. मंत्री कुणी केले. तिसऱ्यावेळी आमदारकीचे तिकीट आम्ही दिले. दोन तुकड्यासाठी दुसऱ्यासोबत जाण्याची कधी स्व.केशर काकू क्षीरसागर यांनी विचार केला नाही. 15 वर्षांत मंत्री असताना काय केले. भ्रष्टाचार केला आणि सांगतात विकास करायचा आहे, असा टोला पवारांनी लगावला. दिवाळीच्या आगोदर निवडणूक, मतमोजणी होणार त्या मतमोजणीत बीडमधून संदीप क्षीरसागर निवडून येणार असे पवार म्हणाले. यावेळी त्यांनी पाच उमेदवार यांची घोषणा केली. राष्ट्रवादीची यादी फायनल झाल्याने भाजपच्या गोटात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...