Elec-widget

जयदत्त क्षीरसागरांच्या चारित्र्याबाबत सबळ पुरावा, पुतण्याचा काकाला धमकी वजा इशारा

जयदत्त क्षीरसागरांच्या चारित्र्याबाबत सबळ पुरावा, पुतण्याचा काकाला धमकी वजा इशारा

माझ्यावरील चारित्र्यचे आरोप सिद्ध करावे. मी निवडणुकीतून विड्रोल करतो, असे आव्हान संदीप क्षीरसागर यांनी दिले आहे.

  • Share this:

बीड,4 ऑक्टोबर: जयदत्त क्षीरसागर हे चारित्र्यावर टीका करून विरोधकांना बदनाम करतात. त्यांनी माझ्यावरील चारित्र्यचे आरोप सिद्ध करावे. मी निवडणुकीतून विड्रोल करतो, असे आव्हान संदीप क्षीरसागर यांनी दिले आहे. विशेष म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांच्या चारित्र्याबाबत आपल्याकडे मोठा पुरावा आहे. तो फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासा किंवा कुठेही तपासा तो 100 टक्के खरा आहे. फक्त तो काढायला लावू नका, असा धमकी वजा इशारा संदीप क्षीरसागर यांनी जाहीर सभेत दिला आहे. काका- पुतण्यामधील संघर्ष टोकाला पोहोचल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

संदीप क्षीरसागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. क्षीरसागर काका-पुतण्यामधील काटेकी टक्कर असलेल्या बीड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट जिल्हा अधिकारी कार्यालयावर रॅली काढली. रॅलीनंतर सभेत संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा खरपूस समाचार घेत पोलखोल केली.

राष्ट्रवादीने जयदत्त क्षीरसागर यांना काय दिले नाही. सगळी पदे दिली. मात्र यांचा श्वास राष्ट्रवादीत कोंदत होता. म्हणून शिवसेनेत जावून श्वास मोकळा केला. यांनी विकासाच्या योजना खाल्या आणि माझ्यावर पंचायत समितीचा भ्रष्टाचाराचा आरोप करतात. त्यांनी केलेल्या योजनांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल माझ्याकडे आहेत. समोरासमोर येऊन एकदा पत्रकारांसमोर होऊ द्या. पुराव्यांनिशी सिद्ध करू..असे म्हणताना माझ्या वडिलांवर आणि माझ्यावर कुटुंबावर, चारित्र्यचा आरोप करतात, त्यांनी माझ्यावर आरोपांचा पुरावा दाखवावा. मी त्यांच्या चारित्र्याबाबत सबळ पुरावा देतो, असे आव्हान संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांना दिले आहे. आरोपांचा पुरावा जर खोटा निघाला तर मी निवडणुकीतून विड्रोल करेल, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. जनतेसाठी मी कायम हजर आहे. खूप अडचणींतून पुढे आलोय आशीर्वाद द्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या काका पुतण्यामधील आरोप प्रत्यारोपामुळे बीड मधील राजकारण चांगलेच तापले. दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांनी गुरूवारी पुतण्या संदीप क्षीरसागरवर जहरी टीका केली होती. आज पुतण्याने त्यांना प्रत्युत्तर देत गंभीर आरोपही केले आहेत.

VIDEO:...म्हणून संजय निरुपम काँग्रेसचा प्रचार करणार नाहीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 09:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...