विधानसभेत चुरस वाढणार.. संभाजी ब्रिगेडने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी

विधानसभेत चुरस वाढणार.. संभाजी ब्रिगेडने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी

संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी आपली 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी ब्रिगेडने 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. सर्व जागांवर ते आपले उमेदवार उभे करणार आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 16सप्टेंबर: 25 वर्षे दुसऱ्यांसाठी लढलो, आता स्वतःसाठी जिंकण्याकरीता निवडणुका लढणार आहोत, असे सांगत 'संभाजी ब्रिगेड'ने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी आपली 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी ब्रिगेडने 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. सर्व जागांवर ते आपले उमेदवार उभे करणार आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची 15 सप्टेंबरला प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद येथील कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या दुसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.

'संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहे,' अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांची दुसरी यादी..

1. डॉ.प्रशांतकुमार उत्तमराव मावंडे- रिसोड मालेगाव

2. राहुल जयवंतराव बलखंडे - वाशिम

3. अजय पांडुरंगजी धोबे- वणी

4. सुभाष भगवानराव कोल्हे- लोहा-कंधार

5. सूर्यकांत मारुती चंद्रे -देगलूर बिलोली

6. बालाजी जनार्धन आगलावे - मुखेड

7. रमेश तात्याराव गायकवाढ- औरंगाबाद पूर्व

8. डॉ. अमितकुमार गोविलकर -कल्याण पश्निम

9. विकास कृष्णा मुकादम- ओहळा माजिवडा

10. पंढरीनाथ संपत सोंडकर -भार वेल्हा मुळशी

11.रंजना सुभाष जाधव- पुणे कॅन्टोन्मेंट

12. छत्रभुज परमेश्वर देशमुख- माजलगाव-बीड

13. गोविंद निंबाजी पोतंगले- परळी, बीड

14. अभिमन्यू शेषराव पवार- औसा, लातूर

संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांची पहिली यादी..

1. माणिकराव महादेव पावडे कारंजा- वाशिम

2. अशिष नरसिंगराव खंडागळे- आर्वी, वर्धा

3. राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे- देवळी, वर्धा

4. दिलीप किसनराव मडावी- गडचिरोली

5. जगदीश नंदूजी पिलारे- ब्रह्मपुरी-चंद्रपूर

6. अरुण नामदेवराव कापडे- वरोरा, चंद्रपूर

7. भगवान भीमराव कदम, भोकर-नांदेड

8. धनंजय उत्तमराव सूर्यवंशी, नांदेड उत्तर

9. बालाजी माधवराव शिंदे, जिंतूर, परभणी

10. टिळक गोपीनाथराव भोस, श्रीगोंदा, अहमदनगर.

11. डॉ. संदीप माणिकराव तांबारे, उस्मानाबाद

12. दिनेश गोपीनाथराव जगदाळे, माढा सोलापूर

13. सोमनाथ विजय राऊत, सोलापूर उत्तर

14. किरण शंकरराव घाडगे, पंढरपूर, सोलापूर

15. ऋतुराज जयसिंगराव पवार, तासगाव-कवठेमहांकाळ, सांगली

बेशिस्तपणाच्या आरोपावर उदयनराजेंचं कॉलर स्टाईल उत्तर, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या