नरेंद्र मोदींना विजयी करणाऱ्या या 'चाणक्य'ने आदित्य ठाकरेंबाबत दिले होते हे संकेत!

नरेंद्र मोदींना विजयी करणाऱ्या या 'चाणक्य'ने आदित्य ठाकरेंबाबत दिले होते हे संकेत!

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा लेखाजोखा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला होता.

  • Share this:

बालाजी निरफळ,(प्रतिनिधी)

उस्मानाबाद, 15 सप्टेंबर: युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागातून निवडणूक लढवली तर शिवसेनेला व आदित्य ठाकरे यांना त्याचा फायदा होईल, असे निवडणूक सर्व्हेक्षक चाणक्य प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले होते. यावरून आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबादमधून आगामी विधानसभा निवडणूक लढवावी या मागणीला जोर धरला आहे.

आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागातून निवडणूक लढवली अशी मागणी जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांनी ही मागणी केली आहे. बोरकर यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.बोरकर यांच्या मागणी मुळे आदित्य ठाकरे उस्मानाबादमधून लढणार काय, याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या बलाढ्य विजयाची रणनीती प्रशांत किशोर यांनीच ठरवली होती. तसेच 'चाय पे चर्चा', 3D सभा, ऑनलाइन दरबार, वॉर रुम, सोशल मीडिया, व्हिक्टरी रुम, घर घर दस्तक, रिंगटोन आणि रेकॉर्डेड मेसेज, अशा नवनव्या प्रचार कल्पना प्रशांत किशोर यांनी राबवल्या होत्या. गुजरातमध्ये 3D प्रचार लोकसभेपूर्वी मोदींच्या 3D सभेचे आयोजन गुजरात निवडणुकीत करण्यात आले होते. त्यावेळी प्रशांत यांनीच ही योजना आखली होती. त्याचवेळी मोदींची प्रतिमा बदलून हायटेक आणि टेक्नोसेव्ही मुख्यमंत्री अशी झाली होती.

प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता शिवसेनेचा 'लेखाजोखा'

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा लेखाजोखा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला होता. या रिपोर्टमध्ये शिवसेनेच्या 23 उमेदवारांचा जय-पराजयाचा अहवाल सादर केला आहे. यात शिवसेनेचा कोणता उमेदवार किती मतांनी विजयी होईल आणि कोणत्या प्रकारच्या अडचणीमुळे उमेदवार निवडून येण्यास असफल ठरेल, हे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते.

कोण आहेत प्रशांत किशोर?

- प्रशांत किशोर (वय-44) हे उत्तर प्रदेशच्या बलियाचे रहिवासी आहेत.

- प्रशांत किशोर हे संयुक्त राष्ट्राच्या 'हेल्थ मिशन'चे दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख म्हणून काम पाहत होते.

- नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी आफ्रिकेतील नोकरी सोडून आले होते.

- भारतातील राजकारण आणि निवडणुकांत काम करण्यासाठी सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स अर्थात CAG कंपनीची स्थापना केली.

- 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींच्या सोशल मीडियाची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे होती.

- 'अब की बार मोदी सरकार' ही टॅगलाईन प्रशांत किशोर यांचीच होती.

- प्रशांत किशोर यांच्या कंपनीने अनेक दिग्गजांच्या प्रचाराची कंत्राटं घेतली आणि त्यांना निवडून आणले.

- दरम्यान, 2015 मध्ये प्रशांत किशोर यांनी मोदींची साथ सोडली.

- बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपऐवजी त्यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

- बिहारमध्ये जेडीयूला भरघोस यश मिळून, नितीश कुमार सत्तेत आले.

- प्रशांत किशोर हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहेत.

- निवडणूक न लढवूनही प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे.

- बिहार निवडणुकीत जेडीयूची रणनीती प्रशांत किशोर यांनीच आखली होती. त्यामुळे जेडीयूला मोठं यश मिळालं.

VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तू तू-मैं मैं; लाडूसाठी तुफान राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 12:45 PM IST

ताज्या बातम्या