ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं, त्या चुलत्यालाच सोडून धनंजय मुंडे गेले राष्ट्रवादीत

ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं, त्या चुलत्यालाच सोडून धनंजय मुंडे गेले राष्ट्रवादीत

तोडून फोडून पवार साहेबांनी बनवलेल्या राष्ट्रवादी पक्षाची त्यांच्याच पायगुणांनी काय अवस्ठा झाली आहे, हे आपण सगळे पाहत आहात, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

बीड,4 ऑक्टोबर: आयुष्यभर ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं.. त्या चुलत्याला सत्तेच्या लालसेमुळे धनंजय मुंडे सोडून राष्ट्रवादीत गेलात. काय केले तिकडे जाऊन? तोडून फोडून पवार साहेबांनी बनवलेल्या राष्ट्रवादी पक्षाची त्यांच्याच पायगुणांनी काय अवस्ठा झाली आहे, हे आपण सगळे पाहत आहात, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. गोपीनाथ मुंडेंचे वय झाले.. गोपीनाथ मुंडेंला लबाडाचे ऑलंपिक द्या.. गोपीनाथ मुंडेंना संपवून टाका, अशी भाषणबाजी करुन गोपीनाथ मुंडेंना त्रास दिलेल्याना जनता विसरत नाही, असाही टोला यावेळी पंकजांनी लगावला. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, महादेव जानकर, माजी मंत्री आमदार सुरेश धस, रमेश अडसकर, रमेश पोकळे, अक्षय मुंदडा, यशश्री मुंडे यांच्यासह भाजपाचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थिती होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर परळी आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या.

पंकजा मुंडे पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा विसरू पडू देणारे नाही. माझ्यातल्या गोपीनाथ मुंडेंचा अपमान होईल, असे वागणार नाही. मी गोपीनाथ मुंडे धारण केला आहे. माझ्यातली पंकजा मुंडे केव्हाच संपली आहे. मला मीडियाने विचारले की, धनंजय मुंडे हे गोपीनाथ गडावर दर्शनाला गेले. ज्यांनी प्रीतम मुंडेंनी गोपीनाथ मुंडे नाव लावले तर आरोप करता की नाव वापरून मतदान हडपण्याचा प्रयत्न करता म्हणून. आता तुम्ही काय करता..आज तुम्ही आठवण काढता.मला पत्रकारांनी विचारले जीवनात कशाचे जास्त दुःख झाले.. तेव्हा मी त्यांना सांगितले, मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा भगवान गडावरील दसरा मेळावा विरोधामुळे दूर होणे, यापेक्षा माझ्यावर भ्रष्टाचाराचा पहिला आरोप झाला, तेव्हा जास्त दुःख झाले. कारण मुंडे साहेबांचा मृत्यू माझ्या हातात असता तर स्वतः चा जीव देऊन त्यांना वाचवले असते. मात्र, मला याचे वाईट वाटले. माझ्या मधल्या गोपीनाथ मुंडे या नावावर शिंतोडे उडवण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. तेव्हा खूप वेदना झाल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. बचत गटाच्या महिलांच्या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यांनी शाबासकी दिली. 'सदा खूश रहो..' हा आशीर्वाद दिला. मी तुमच्या विकासासाठी राजकरणात आहे. अस्तित्वासाठी एक जण लढतोय. धनंजय मुंडे चिडीचा डाव खेळतोय. मी निर्भीड आहे म्हणून मी राजकरणात टिकून आहे. मी कोणाला घाबरत नाही. कुठल्याच दडपणाला आणि ब्लॅकमेंलिंगला घाबरत नाही. मी खोटी आश्वासने देत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी माझ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देते. काळजी घेते. धनंजय मुंडे स्वतःच्या कार्यकर्तांना धमक्या देतात, असा आरोप पंकजांनी केला. परळी मतदारसंघांचे मी स्वत: सुरक्षा कवच असल्याचे पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले.

मुंडे साहेब असताना पक्ष सोडून गेलेले नेते मी भाजपमध्ये आणले, म्हणून माझ्या बापाला आनंद वाटत असेल. शक्तीहीन माणसांच्या नेतृत्त्वखाली ही माणसे शोभत नाही. माझा भाऊ माझा प्रचार करतोय. हजार गायी दिल्या पण तीन गायी मेल्याचा आरोप करताना हजार गाई वाटल्याचं, मान्य करतात असे त्या म्हणाल्या. दगडापेक्षा विट मऊ म्हणून लोक मला म्हणतात. "होय मी विट आहे. पण ती विठ्ठलाच्या चरणांखालची. जनता जनार्धन हा देव आहे. त्यांच्यात पायाखालची विट मी आहे. आयुष्यभर सेवा करणार. माझ्याकडे चांगले तरुण आहेत. माझ्याकडे 90 टक्के महिला आहे. पाच वर्षे मी जिल्हा घडवला. जिल्ह्यातील सगळ्या आमदारांना निवडून आणणार आहे. राज्यातील 40 आमदार निवडून आणणार आहे. ज्यांना चार चार वेळा मी पराभूत केले त्यांना राष्ट्रवादीने राज्याचा नेता केले, असे म्हणत धनंजय मुंडेंचा पाय गुण वेगळा आहे. धनंजय मुंडे पडले तरी आमदार राहणार आहे. म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभे रहा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी मतदारांना केले.

VIDEO:...म्हणून संजय निरुपम काँग्रेसचा प्रचार करणार नाहीत

Published by: Sandip Parolekar
First published: October 4, 2019, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading