ओबीसी नेत्यांचं अंडरस्टँडिंग.. लोकसभेच्या मदतीची पंकजा मुंडे अशी करणार परतफेड

ओबीसी नेत्यांचं अंडरस्टँडिंग.. लोकसभेच्या मदतीची पंकजा मुंडे अशी करणार परतफेड

लोकसभा निवडणुकीत मदतीला धावून आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी खुद्द पंकजा मुंडे बीड मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड, 9 ऑक्टोबर: लोकसभा निवडणुकीत मदतीला धावून आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी खुद्द पंकजा मुंडे बीड मतदारसंघात तळ ठोकून आहेत. काका-पुतण्याची चुरशीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे ओबीसी नेत्यांसोबतच अंडरस्टँडिंगचं राजकारण सर्व ठिकाणी पाहायला मिळाले होते. आज तीच री ओढत पंकजा मुंडे यांनी देखील मुंडे-क्षीरसागर संबंध कायम ठेवले आहेत.

शिवसेनेचे नेते आणि बीड मतदार संघाचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी करत पंकजा मुंडे यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. विशेष म्हणजे दसरा मेळाव्यात जयदत्त क्षीरसागर पहिल्यांदाच सावरगावला हजर होते. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेच्या दोन नेत्यांमध्ये मदतीची परतफेड करणारी बाब चर्चेचा विषय ठरली आहे.

क्षीरसागर आणि मुंडे या दोन कुटूंबाचा जिव्हाळा आणी सलोखा वर्षानुवर्षे कायम आहे. राजकिय विचारधारा वेगवेगळी असतानाही या दोन कुटुंबांनी एकमेकांच्या हिताचा विचार नेहमीच केला आहे. स्व. गोपीनाथ मुंडे आणि क्षीरसागरांचा बंगला कधी परका वाटला नव्हता. अडचणीच्या काळात या दोन कुटुंबांनी राजकीय चपला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना मेळावा घेऊन खासदार प्रीतम मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. जिल्हाभरातील कार्यकर्ते कामाला लावले होते.

बीड विधानसभा मतदार संघात गावागावात जाऊन खासदार प्रीतम मुंडेंसाठी सभा घेतल्या, याचा परिणाम खासदार प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत मुंडे भगिनी अडचणीत असताना जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरले नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बीडमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून जयदत्त क्षीरसागर मैदानात आहेत. या लढतीत काका क्षीरसागराच्या मदतीसाठी आता पंकजा मुंडे मैदानात उतरत आहेत. बीड मतदार संघात पहिली सभा गुरुवारी (10 ऑक्टोबर) रायमोहा येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारसभा पेक्षा शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागराच्या प्रचार सभेला प्राधान्य दिले आहे. यामुळे मुंडे-क्षीरसागर या ओबीसी नेत्याचे वेगवेगळ्या पक्षात राहून अंडर स्टँडिंग पाहायला मिळाली. यामुळे मतदारसंघात अनेक समीकरणे बदलणार आहेत तर नाराज भाजपची समजूत पंकजा मुंडे कशी काढतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

VIDEO: वरातीत तरुणाने फटाके नाही तर पिस्तुलाने केला हवेत गोळीबार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 03:06 PM IST

ताज्या बातम्या