..तोपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर टीका करत बांधली खूणगाठ

..तोपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर टीका करत बांधली खूणगाठ

राष्ट्रवादी हे बुडणार जहाज, सगळ्याचा अंत जवळ आल्याने ते त्या जहाजात आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,12 ऑक्टोबर: जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, अशी खूणगाठ भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बांधली आहे. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

माझ्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हे काही नवीन स्व.गोपीनाथ मुंडे असताना देखील सगळे लक्ष लागायचे राष्ट्रवादीची लोक खोटा प्रचार करतात की पंकजा मुंडेना भीती वाटते. मी महाराष्ट्रात प्रचार करुन माझा मतदारसंघ सांभाळते मला चिंता महाराष्ट्राची आहे. बीड जिल्ह्यात एकही बंडखोरी नाही. पाच वर्षांत पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात कारभार नाही तर संसार केला, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडेसारखे कर्तृत्वान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी केली. माझी निवडणूक काही अवघड नाही. विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी हे बुडणार जहाज, सगळ्याचा अंत जवळ आल्याने ते त्या जहाजात आहेत. भाजपाच्या मोठ्या जहाजात तारण्यासाठी अनेकांनी उड्या मारल्या.

धनंजय मुंडे म्हणतात की, त्यांच्या भीतीने परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा घेत आहेत. अरे पंकजा मुंडे कोणाला भीत नाही, मोदी लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर शाबासकी देण्यासाठी म्हणून परळीत येत आहेत. पंतप्रधान आले तर बीड जिल्ह्याला कायम स्वरूपी दुष्काळ मूक्तीची घोषणा करू शकतील. भरघोस निधी मिळाला तर कष्ट संपतील राष्ट्रवादीच्या पणवती लोकांना विकासाचे देणे घेणे नाही. ते तर भकास गावचे राजे आहेत, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा समाचार घेला. तसेच 370 वर टीका करणारे पाकिस्तानचे आहेत का? राष्ट्रहीत दिसत नसेल तर राष्ट्रवादीवाल्याचे नाव बदलले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या