पंकजा मुंडेंच्या भावना अनावर.. 'घाण' ओकणाऱ्या नेत्याच्या तोंडाला 'जामर' लावा

पंकजा मुंडेंच्या भावना अनावर.. 'घाण' ओकणाऱ्या नेत्याच्या तोंडाला 'जामर' लावा

पंकजा मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादीचा नायनाट हा माझ्या हातूनच होणार

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,18 ऑक्टोबर: माझ्या जीवनातील ते क्षण जे माझ्या लेकराचे होते, माझ्या कुटुंबाचे होते. तेवढे क्षण मी तुम्हाला दिले कारण तेवढे क्षण माझे बाबा कमी जगले. अर्ध्या ताटावरून माझे वडील गेले. त्यामुळे तुमची सेवा मी केली, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या भावना अनावर झाल्या. राष्ट्रवादीचे नेते माझ्यावर आरोप करतात. किती वाईट बोलतात किती घाण ओकतात. मोबाइल टॉवरला जामर लावा म्हणणाऱ्या नेत्याच्या तोंडाला 'जामर' बसवा, असा टोला धनंजय मुंडे यांना लगावला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादीचा नायनाट हा माझ्या हातूनच होणार आहे. काल माझ्या भावाने माझ्याविरुद्ध खूप घाणेरडे भाषण केले? आणि मी कितीही नाही बोलायचे म्हणले तरी मला बोलण्यास मजबूर करत आहेत. राष्ट्रवादीवाले इतके वाईट बोलतात की, माणसाने कानात गंगाजल टाकावे इतके यांचे विचार घाणेरडे बोलतात. ते सारखं कालपासून भाषण करत आहेत की, ताईनी सुरेश धसपासून ते अक्षय मुंदडापर्यंत सेटलमेंट केली. धनंजय मुंडे नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे तरी काय? असा सवाल ही पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केला. त्या म्हणाल्या, मला एकवेळा निवडून येऊ द्या मग बघू...अशा शब्दांत धनंजय मुंडेंना पंकजा मुंडे यांनी सुनावले.

उदयनराजे भोसलेंनी परळीत पुन्हा उडवली 'कॉलर'

कॉलर उडवत एक भाऊ निघून गेला तर काय झालं, हा भाऊ तुमच्यासोबत आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांना देत भाजपचे नेते आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची तोफ डागली. मी कोणाचा विश्वासघात केला नाही तर त्यांनीच माझा विश्वासघात केल्याचा गौप्यस्फोट उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस जरी एकवटून परळीत आली तरी पंकजा मुंळेंच्या कमळाला कोणी अडवू शकणार नाही. एक भाऊ गेला तर काय झाले हा भाऊ तुमच्यासोबत आहे, असे म्हणत सभेत कॉलर उडवत एक बार मैने कमिटमेंट की तो मै अपने आप की भी नही सूनता, असे म्हणत त्यांनी याद राखा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.

परळी येथील गणेशपार भागात पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ उदयनराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, महादेव जानकर उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, की मी कोणाचा विश्वासघात केला नाही तर त्यांनी माझाच विश्वास मोडला. धनंजय मुंडे यांचे नाव न घेता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या अडचणी सोडवून देखील कोणी विश्वासघात केला? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी यावेळी केला. उदयनराजे भोसले आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले की, माझ्या बहिणीला निवडून देण्यासाठी एक बार जो मैने कमिटमेंट कर ली तो मै अपनी आप की भी नही सूनता, असा पुनराच्चार केला. यावेळी पंकजा मुंडे यांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

माझ्या भावाला का मारलं? राज ठाकरेंच्या सभेत राडा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 08:32 PM IST

ताज्या बातम्या