धनंजय मुंडेंनी 'राम-लक्ष्मण'ची जोडी फोडण्याचं काम केलं, पंकजा मुंडेंचा घणाघात

धनंजय मुंडेंनी 'राम-लक्ष्मण'ची जोडी फोडण्याचं काम केलं, पंकजा मुंडेंचा घणाघात

पंकजा यांना कधी क्षमा करू नको, असे मुंडे साहेबांनी घेतले होते वचन...

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,19 ऑक्टोबर:स्व.गोपीनाथ मुंडे आणि स्व.पंडित अण्णा मुंडे या 'राम-लक्ष्मण'ची जोडी फोडण्याचे काम धनंजय मुंडेंनी केल्याची घणाघाती टीता पंकजा मुंडे यांनी केली आहे. मुंडे साहेबांच्या वाईट काळात सोडून गेलात, जनता कधीच माफ करणार नाही. माझ्यावर आरोप करतात की, साहेबांना सोडून गेलेल्यांना ताई भाजपमध्ये घेतात तुम्ही साहेबांना सोडून कोणाला जावून मिळालात? पंकजा यांना कधी क्षमा करू नको, मुंडे साहेबांनी वचन घेतल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

साहेबांचे सोडा तुमचे वडील पंडित अण्णांवर काय वेळ आणली तुम्ही. राष्ट्रवादीत अगोदर पाठवलं वार झेलण्यासाठी ते पराभूत झाल्यानंतर ज्या अण्णाचे राजकारणात लोक जोड्यासहीत पाया पडत होते. मुंडे साहेबांच्या बरोबरीने समजत होते. एव्हढंच नाही तर स्व.गोपीनाथ मुंडे आणि स्व.पंडित अण्णा मुंडे या राम लक्ष्मणाची जोडी तुम्ही फोडली. आणि नाव घेता माझे असे म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेवर निशाणा साधला.

परळी येथील गणेशपार भागात पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ उदयनराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते. या सेभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उदयनराजे भोसले, खासदार प्रितम मुंडे, महादेव जानकर, यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्या म्हणल्या की, राष्ट्रवादीचा नायनाट करणे हे माझ्या हातूनच होणार आहे. काल माझ्या भावाने माझ्याविरुद्ध खूप घाणेरडे भाषण केले? आणि मी कितीही नाही बोलायचे म्हटले तरी मला बोलण्यास मजबूर करत आहेत. राष्ट्रवादी वाले इतके वाईट बोलतात की, माणसाने कानात गंगाजल टाकावे इतके यांचे विचार घाणेरडे आहेत. कालपासून सारखं भाषण करत आहेत, की ताईनी सुरेश धसपासून ते अक्षय मुंदडापर्यंत सेटलमेंट केली. धनंजय मुंडे नेमकं तुम्हाला म्हणायचंय तरी काय ? असा सवाल ही पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केला. त्या म्हणाल्या, मला एकवेळा निवडून येऊद्या, मग बघू..अशा शब्दांत धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंनी सुनावले आहे.

VIDEO:मौनीबाबा नाहीये, अमित शहांची मनमोहन सिंगांवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या