खासदार इम्तियाज जलील यांच्या घराजवळ लावले 'हे' बॅनर, टाकला बहिष्कार

मागील पंचवार्षिकमध्ये कुठलीही कामे झाली नसल्याचा आरोप...

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 03:12 PM IST

खासदार इम्तियाज जलील यांच्या घराजवळ लावले 'हे' बॅनर, टाकला बहिष्कार

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,13 ऑक्टोबर: खासदार इम्तियाज जलील यांच्या घराजवळ राहणाऱ्या नागरिकांनी 'नो एमआयएम' (No MIM)असे बॅनर झळकवत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. नागरी सुविधा मिळत नसल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्याच घराजवळील रोझाबाग परिसरातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत 'नो एमआयएम' असे बॅनर झळकावत निदर्शने केली.

एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे नेहमी विकासाबाबत आग्रही असतात. मात्र, त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या नागरिक त्यांच्यावर नाराज आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये कुठलीही कामे झाली नसल्याचा आरोप... चक्क खासदार इम्तियाज जलील यांच्या घराजवळ राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. नागरिकांनी बहिष्काराचे निवेदन निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. रोझाबाग परिसरात राहिवाशांनी जोरदार घोषणाबाजी करीत 'नो एमआयएम' असे बॅनर झळकावत निदर्शने केली.

इम्तियाज जलील यांनी यंदाही मारली 'दांडी'

दरम्यान,17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली होती. सलग चार वर्षे आमदार असताना आणि आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही जलील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळले होते. त्यामुळे सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

Loading...

'सामना'च्या दणक्यानंतर खासदार जलील म्हणाले माझं चुकलंच...

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून करण्यात आली होती. माझं चुकलंच! असे सांगत पुढच्या वर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला जातीने हजर राहील, अशा ग्वाही खासदार जलील यांनी दिली होती.

VIDEO : 40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...