'फेसबुक पोस्ट'वरून चर्चेला उधाण.. राष्ट्रवादीसह आणि पवार साहेबांचा फोटो गायब

'फेसबुक पोस्ट'वरून चर्चेला उधाण.. राष्ट्रवादीसह आणि पवार साहेबांचा फोटो गायब

शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या ज्या पाच उमेदवारांची घोषणा केली होती त्यापैकी नमिता मुंदडा या एक उमेदवार आहेत.

  • Share this:

बीड,22 सप्टेंबर:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केलेल्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या 'फेसबुक पोस्ट'वरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे नमिता मुंदडा याच्या पोस्टमधून राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पवार साहेब यांचा फोटोही गायब आहे.

शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या ज्या पाच उमेदवारांची घोषणा केली होती त्यापैकी नमिता मुंदडा या एक उमेदवार आहेत. नमिता मुंदडा या दिवंगत विमल मुंदडा यांच्या सुनबाई आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासोबत मुंदडा कुटुंबाचे कधी ही पटले नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली आहे.

मुंदडा कुटुंब नाराज..

'स्व.डॉ. सौ.विमलताई मुंदडा यांनी गेली 25 वर्षे लोकांच्या हितासाठी पूर्ण आयुष्य दिले, मतदारसंघातील प्रत्येकाशी कौटुंबिक नाते निर्माण करून थेट संपर्क ठेवला. पण मार्च 2012 मध्ये ताई आपल्यामधून अचानक निघून गेल्या. मागील 7 वर्षांपासून आमच्या संपूर्ण कुटुंबाने कुठलेही पद नसताना लोकांच्या हितासाठी काम सुरू ठेवले. हेच नाते आता मला पुढे कायम ठेवून, मतदारसंघाचा विकास करायचा आहे, येत्या विधानसभेसाठी मी उभी राहणार आहे. आपला आशिर्वाद असावा, ही नम्र विनंती,' अशी पोस्ट करत नमिता मुंदडा यांनी पक्षांतर्गत बंडखोरीला बळ दिल्याचा आरोप केला आहे.

पहिली यादी जाहीर करणं ही माझी चूकच, असे का म्हणाले शरद पवार

शरद पवार यांनी बुधवारी बीडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातल्या 5 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात धनंजय मुंडे यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होता. मात्र अशी यादी जाहीर करणं ही माझी चूकच होती अशी प्रांजळ कबुली शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिलीय. असे उमेदवार जाहीर करणं हे काम पक्षाच्या राज्याध्यक्षांचं आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आणि आग्रहामुळे मी ती नावं जाहीर केली असंही त्यांनी सांगितलं. बीडमध्ये आज शरद पवार यांनी मोठी घोषणा करत राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावंही जाहीर केली होती.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र आता या जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार यांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसंच परळीमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

कोणत्या मतदारसंघातून राष्ट्रवादीने कुणाला दिली उमेदवारी?

परळी - धनंजय मुंडे

बीड- संदीप क्षीरसागर

माजलगाव - प्रकाश सोळके

गेवराई - विजयसिंह पंडित

केज - नमिता मुंदडा

शरद पवार यांनी निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा केल्याने जिल्ह्यातील राजकारण मोठे चुरशीचे होणार आहे. राष्ट्रवादीच्या या खेळीला आता भाजप कसे उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं आहे. ही शरद पवार हे सध्या राज्याच्या दौरा करत आहेत. या दौऱ्यावेळीच पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांबद्दल भाष्य केलं आहे.

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 05:04 PM IST

ताज्या बातम्या