नाराज कार्यकर्त्याने थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच लिहिले रक्ताने 'लेटर'

नाराज कार्यकर्त्याने थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच लिहिले रक्ताने 'लेटर'

विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली असताना राष्ट्रवादीतून नाराजीचा सूर निघाला आहे.

  • Share this:

औरंगाबाद,6 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली असताना राष्ट्रवादीतून नाराजीचा सूर निघाला आहे. पैठण मतदारसंघातील माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. संजय वाघचौरे यांच्या एका समर्थकाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. युवराज चावरे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.

युवराज चावरे यांनी काय लिहिले आहे पत्रात..

'साहेब, ज्या संजय वाघचौरे यांनी गेल्या 20 वर्षांपासून पैठण तालुक्यात राष्ट्रवादी जिवंत ठेवली त्यांनाच डावलून पक्षाने काल प्रवेश केलेल्या एकाला उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट उमटली आहे. संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादीचे अनेक कार्यक्रम स्वखर्चातून घेतले. पक्षवाढीसाठी पायाला भिंगरी लावल्यागत फिरत पक्ष बांधणी केली. आणि त्यांच्यावर अन्याय झाला. पवारसाहेब, अजितदादा व जयंत पाटील साहेब आपल्या शब्दाच्या पुढे कधीही न गेलेले संजय वाघचौरे यांच्यावर हा अन्याय का? याकरता हे रक्तरंजित पत्र लिहित आहे. साहेब अजुनही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा पैठण तालुक्यात निष्क्रीय लोकांच्या हातात उमेदवारी गेल्याने पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही,' अशा आशयाचे पत्र पैठण तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ता युवराज चावरे यांनी लिहिले.

उमेदवारी अर्ज छाननीत संजय वाघचौरे यांनी मला 'राष्ट्रवादी'चा अधिकृत एबी फॉर्म मिळाला म्हणत गोर्डेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. मात्र, वाघचौरे यांनी दाखल केलेल्या एबी फॉर्ममध्येच त्रुटी आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने वाघचौरे यांचा आक्षेप फेटाळत, गोर्डे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. या संभ्रमामुळे कार्यकर्ता युवराज चावरे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे.

5 वर्षांच्या मुलीची छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

Published by: Sandip Parolekar
First published: October 6, 2019, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading