तुम्ही गल्लीत विटी दांडू खेळता काय, धनंजय मुंडेंवर धाकट्या बहिणीची टीका

तुम्ही गल्लीत विटी दांडू खेळता काय, धनंजय मुंडेंवर धाकट्या बहिणीची टीका

जनतेच्या काळजाला हात घालणारी भाषण करता येतात. पण लोकांच्या मनात घर करणारे काम करा, असा सल्ला प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना दिला.

  • Share this:

बीड,3 ऑक्टोबर:विधानपरिषदेचे विरोधीपक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे म्हणतात, की दोन-दोन वेळा बहिणीला निवडणूक दिले. एक वेळ तरी भावला संधी द्या..काय चालू हे निवडणूक विधान सभेची आहे. विटी दांडू खेळता काय गल्लीत..तुझीच विट्टी आणि तुझाच दांडू दोनदा तुला कोलु दिले, आत्ता दे की मला कोलुन... काय लावले..विटी दांडू खेळता का? विधान सभेची निवडणूक आहे. तुम्हाला संधी हवी असेल तर काम करून दाखवा ना, अशा शब्दात खासदार डॉ प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.

पंकजा मुंडेंनी गुरूवारी परळीत उमेदवारी अर्ज दाखल केली. त्यानंतर खासदार प्रितम मुंडे यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे, महादेव जानकर, माजी मंत्री आमदार सुरेश धस, रमेश अडसकर, रमेश पोकळे, अक्षय मुंदडा, यशश्री मुंडे यांच्या सह भाजपचे अनेक नेते उपस्थिती होते.

जनतेच्या काळजाला हात घालणारी भाषण करता येतात. पण लोकांच्या मनात घर करणारे काम करा, असा सल्ला प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना दिला. यावेळी धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपांचा पुरता खरपूस समाचार घेतला. तसेच परळी नगर पालिकेच्या विकास कामच बुरखा फाडला.

धनंजय मुंडेचे भावुक शब्द..

दुसरीकडे, धनंजय मुंडेंनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंजय मुंडे यांनी आधी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. जनसामान्यांसाठी लढत राहण्याचा, संघर्ष करत राहण्याचा वारसा ज्यांच्याकडून मला मिळाला ते माझे आप्पा, असे भावुक उद्गार धनंजय मुंडे यांनी यावेळी काढले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी धनंजय मुंडेंनी बारा ज्योर्तिंलिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथाचे दर्शन घेतले. शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

VIDEO : तुम्हाला आचारसंहिताच कळत नाही, शिवसेना नेत्याची पोलिसांसोबत बाचाबाची

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading