आष्टीत भाजपचे दोन 'पहेलवान' आमने-सामने.. तिकिटासाठी रस्सीखेच

आष्टीत भाजपचे दोन 'पहेलवान' आमने-सामने.. तिकिटासाठी रस्सीखेच

आष्टी मतदार संघात भाजपमध्ये तिकिटावर विद्यमान आमदार भीमराव धोडे आणि माजी मंत्री आमदार सुरेश धस यांच्यात रस्सीखेच सुरु आहे.

  • Share this:

बीड,28 सप्टेंबर: बीड आणि नगर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग देणारा दुवा मतदार संघ म्हणून आष्टी मतदार संघाची ओळख आहे. एकेकाळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा गड राहिलेल्या या मतदार संघ माजी मंत्री सुरेश धस यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकही बडा नेता राहिला नाही. मात्र,आष्टी मतदार संघात भाजपमध्ये तिकिटावर विद्यमान आमदार भीमराव धोडे आणि माजी मंत्री आमदार सुरेश धस यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. यामुळे भाजपमध्ये तिकीट वाटपानंतर बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार सुरेश धस यांनी मुलगा जयदत्त धस यांना पुढे करत तिकिटावर दावेदारी केली. या गटबाजीचे प्रदर्शन महाजनादेश यात्रेत स्वतंत्र दोन सभा घेत झाले होते, तेव्हापासून आजपर्यत ही धुसपूस सुरूच आहे. याच विरोधकांना फायदा होऊ शकतो. पाच जागेची घोषणा करणाऱ्या पवारांनी आष्टीची जागा मागे ठेवली. यामुळे लढत अद्याप स्पष्ट नाही.

रांगडा नेता म्हणून महाराष्ट्रात परिचित आमदार सुरेश धस व पंधरा वर्षे आमदार राहिलेले भीमराव धोंडे 2014 मध्ये आमने-सामने होते. आष्टी- पाटोदा- शिरुर हा मतदारसंघ बीडमध्ये भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ मानला जातो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 2 लाख 50 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपचे भीमराव धोंडे 48.30 टक्के मते घेऊन विजयी झाले होते तर तेव्हाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनीही कडवी झुंज देत 45.90 टक्के मते घेतली होती. त्यावेळी धोंडे फक्त 5 हजार 982 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. आता दोघे भाजपच्या उमेदवारीवर दावा करत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरु.. बाळासाहेब आजबे, सतिष शिंदे की..नवीन चेहरा..

राष्ट्रवादीने पहिल्या यादीत बाकी ठेवलेल्या आष्टी मतदार संघात राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे व युवानेते सतिश शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीने बीडमधील आष्टी वगळता सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली असून आष्टी मतदारसंघाबाबत मात्र राष्ट्रवादीने अजूनही सस्पेंस कायम ठेवला आहे. त्यामुळे तर्क-विर्तकांना उधाण आले असून कदाचित ही जागा काँग्रेसला सोडणार असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री सुरेश धस यांचे चिरंजीव व युवानेते जयदत्त धस हे भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तसेच जयदत्त धस यांचे तरुण कार्यकर्तेही 'भावी आमदार जयदत्त धस' या नावाने हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर टाकत आहेत. तसेच मतदाराच्या गाठीभेटींचा सुरु आहेत. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांचा शब्द आमच्यासाठी अखेरचा असेल, असे सुरेश धस यांनी सांगितले होते. त्या जो कोणी उमेदवार येथे देतील त्यांना आम्ही मदत करणार असल्याचेही धस यांनी सांगितले.

1) बीड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुरेश धस यांच्या गटातील पाच नगरसेवकांनी पंकजा मुंडे यांना म्हणजेच भाजपच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे तेथे कमी संख्याबळ असूनही भाजपने सुरेश धस यांच्या मदतीने बीड जिल्हा परिषद काबीज केली होती. सध्या येथे भाजपच्या सविता गोल्हार या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत.

2) या प्रकरणानंतर राष्ट्रवादीने व्हीप बजावत सुरेश धस यांच्यावर कारवाई केली होती. तेव्हापासूनच धस आणि राष्ट्रवादीमध्ये बिनसले व नंतर सुरेश धस भाजपात आले.

3) आष्टी विधानसभा मतदारसंघ आष्टीचे पूर्वीचे आमदार रखमाजी गावडे (१९५२-१९५७), विश्‍वनाथभाऊ आजबे (१९५७-१९६२),भाऊसाहेब आजबे (१९६२-१९६७),अॅड.निवृत्तीराव उगले(१९६७-१९७२), श्रीपत कदम (१९७२-१९७८), लक्ष्मणराव जाधव(काँग्रेस)(१९७८-१९८०), भीमराव धोंडे(अपक्ष)(१९८०-१९८५), भीमराव धोंडे(काँग्रेस)१९८५-१९९०), भीमराव धोंडे (काँग्रेस)(१९९०-१९९५), साहेबराव दरेकर(अपक्ष)

(१९९५-१९९९), सुरेश धस(भाजप)(१९९९-२००४), सुरेश धस(भाजप)(२००४-२००९), सुरेश धस (राष्ट्रवादी)(२००९-२०१४), भीमराव धोंडे(भाजप)(२०१४-२०१९)

पवार कुटुंबात खरंच गृहकलह? मनोहर जोशी काय म्हणाले, पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 03:24 PM IST

ताज्या बातम्या