ओवैसी म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पिक्चर 'दी एंड', मोदी- पवारांची सेटिंग

ओवैसी म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पिक्चर 'दी एंड', मोदी- पवारांची सेटिंग

नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची केंद्रात एक आणि राज्यात एक सेंटीग आहे. पवार साहब कबतक मॅच फिक्सिंग करोगे, अशा शब्दांत एमआयएमचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,9 ऑक्टोबर:राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर आरोप करते की,हे मॅनेज आहेत, मात्र तीन तलाकचे विधेयक आले तेव्हा शरद पवार काहीच बोलले नाही. मी त्यांना विचारतो की, तीन तलाकच्या मुद्यावर पवारांनी आणि राष्ट्रवादीने विरोध का केला नाही. उलट शरद पवारांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले. नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची केंद्रात एक आणि राज्यात एक सेंटीग आहे. पवार साहब कबतक मॅच फिक्सिंग करोगे, अशा शब्दांत एमआयएमचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. बीडमधील एमआयएमचे उमेदवार शेख शफीक यांच्या प्रचारसभेत खासदार असदुद्दीन ओवैसी बोलत होते.

खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीचा पिक्चर आता संपला आहे. त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही. ते आमच्यावर आरोप करतात. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे कित्येक आमदार भाजप आणि शिवसेनेमध्ये गेले आहेत. तिथून तिकीट घेऊन ते निवडणूक लढवत आहेत आणि माझ्यावर आरोप करतात. माझा गुन्हा फक्त एवढाच आहे की, मी भाजप, कॉंग्रेस. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला घाबरत नाही.

संविधान आणि देशात शांती आणण्यासाठी बीडमधील एमआयएमचे उमेदवार शेख शफीक यांना निवडून द्या, असे आवाहन खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

धनंजय मुंडेंसाठी 82 वर्षांचा 'हा' नेता गाजवणार मैदान!

परळी रेणापूर मतदारसंघात स्व.गोपीनाथ मुंडेयांचा पराभव करणारी व्यक्ती आज धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा हातात घेवून मतदारसंघ पिंजून काढत आहे. वयाच्या 82 व्या वर्षी परळी मतदारसंघात फिरणारे माजी आमदार पंडितराव दौंड हे मैदानात उतरले असून त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. परळी मतदारसंघात वेगळी ओळख आहे. 1985 मध्ये परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांना 3500 मताधिक्याने पराभूत करून त्यांनी विजय खेचून आणला होता. त्यावेळी त्याची चर्चा सर्व महाराष्ट्रात झाली होती. तेच पंडितराव दौंड आज धनंजय मुंडेंसोबत आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना परळी मतदारसंघांमध्ये मात्र मुंडे बंधू-भगिनीच्या लढत महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे.

VIDEO : समोर पैलवानच दिसत नाही, मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

Published by: Sandip Parolekar
First published: October 9, 2019, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading