Elec-widget

जयदत्त क्षीरसागरांनी मुस्लिम समाजात गुंड तयार केले, MIM नेत्याचा आरोप

जयदत्त क्षीरसागरांनी मुस्लिम समाजात गुंड तयार केले, MIM नेत्याचा आरोप

मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या जोरावर जयदत्त क्षीरसागर यांनी पन्नास वर्षे सत्ता भोगली. त्यांनी समाजासाठी काहीच केले नाही, उलट गुंड प्रवृतीचे लोक तयार केले.

  • Share this:

बीड,26 सप्टेंबर: मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या जोरावर जयदत्त क्षीरसागर यांनी पन्नास वर्षे सत्ता भोगली. त्यांनी समाजासाठी काहीच केले नाही, उलट गुंड प्रवृतीचे लोक तयार केले. जेलमध्ये जाणारे त्यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यात मरणारे मुस्लिम आणि मारणारे मुस्लिमच असतात. हा 'उद्योग' क्षीरसागरांनी केला असल्याचा घणाघाती आरोप एमआयएमचे बीडचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी केला आहे.

शेख निजाम यांनी एमआयएमच्या कार्यकर्ता बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एमआयएम बीडची जागा ताकतीने लढवणार असून या निवडणुकीत क्षीरसागर यांचे अस्तित्व संपून टाकू, असाही चंग त्यांनी बांधला आहे. बीड विधान सभा मतदार संघात मुस्लिम समाज निर्णायक आहे. यामुळे जयदत्त क्षीरसागर यांना एमआयएमला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. तसेच औरंगाबाद लोकसभेप्रमाणे बीडमध्ये एमआयएम करिश्मा करणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शेख निजाम यांनी सांगितले की, 2004 पासून मुस्लिम समाजाच्या मुलीच्या वसतीगृहासाठी निधी पडून आहे. पण नगरपालिकेने जागा दिली नाही. ही बाब आता समजाच्या लक्षात आली आहे. मुस्लिम समाज कधीच त्यांना माफ करणार नाही. मुस्लिम समाजच नाही तर इतर समाजाला तरी काय दिले, असा घणाघात देखील शेख निजाम यांनी केला आहे. बीड मतदार संघात सगळ्या सत्ता क्षीरसागर कुटुंबाच्या घरात आहेत. मंत्री आमदार, नगराध्यक्ष , उपनगरअध्यक्ष जिल्हापरिषद सदस्य नगरसेवक यामुळे बीडचा विकास खुंटला आहे. खरा जातीवाद क्षीरसागर कुटुंबाने केला. त्यामुळे येत्या निवडणुकीत एमआयएम आणि मुस्लिम समाज त्यांना जागा दाखवून देणार आहे. किती वेळा मुस्लिम समाजाने त्यांना निवडून दिले. सत्ता दिल्या त्यांनी काय विकास केला. एमआयएम फक्त निवडणूक लढवण्यासाठी नाही तर.. बीडमध्ये क्षीरसागराच्या विरोधात कोणी सक्षम पर्याय आला तर एमआयएम त्याच्या पाठीशी उभी राहील. मात्र, बीडमधून क्षीरसागरांना संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही शेख निजाम यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.

दारूच्या दुकानात राडा, भरलेली बिअरची बाटली डोक्यात फोडली LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...