पंकजा मुंडेंना धक्का.. 'माधव'मधील माळी समाजाचा हा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

पंकजा मुंडेंना धक्का.. 'माधव'मधील माळी समाजाचा हा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

माळी-धनगर-वंजारी या 'माधव; समीकरणातील सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,12 ऑक्टोबर: स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या माळी-धनगर-वंजारी या 'माधव; समीकरणातील सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने पंकजा मुंडेंना धक्का समजला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसोबत असलेले कल्याणराव आखाडे लोकसभा निवडणुकीपासून नाराज होते. भाजपसोबत एकनिष्ठ काम करून सत्तेचा वाटा दिला नाही, वारंवार डावलले. यामुळे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर नाराज होऊन राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ओबीसी मतांचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

स्व.गोपीनाथ मुंडेंसोबत भाजपाची महत्त्वाची ओबीसी संघटना म्हणून ओळख असलेल्या सावता परिषदेचा माळी समाजात मोठा दबदबा आहे. कल्याणराव आखाडे हे मागील अनेक वर्षांपासून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा आणि राज्यभरात काम करीत होते. अरण या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी ते माळी समाज बांधवांचा पंकजांच्या उपस्थितीत मोठा मेळावाही घेत असत. बीड जिल्ह्यात वंजारी, धनगर या समाजानंतर माळी समाजाची मोठी मते आहेत. काही दिवसापूर्वी आखाडे यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली होती. याच भेटीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार सावता परिषद भाजपसोबत काडीमोड करून शरद पवार यांच्या उपस्थितीत गेवराईमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यात सावता परिषदेची मोठी ताकद आहे.

माळी समाजाचे एवढं मोठं संघटन असतानाही आमची सत्ताधार्‍यांनी उपेक्षा केली. आपला विचार होताना दिसला नाही. माळी समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार हे आश्वासक वाटल्याने आपण हा प्रवेश करत असल्याचे कल्याणराव आखाडे यांनी सांगितले आहे.

VIDEO: PMC चे खातेदार 'राज'दरबारी, बैठकीबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

Published by: Sandip Parolekar
First published: October 12, 2019, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading