कामगारांना 'अच्छे दिन', निवडणुकीच्या प्रचारासाठी मजूर झाले पगारी कार्यकर्ते

दिवसभर मोलमजुरी करून जेवढा पैसा मिळत नाही तेवढा दोन तासांच्या प्रचार रॅलीमध्ये मिळत असल्याचे काही कामगारांनी सांगितले

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 06:05 PM IST

कामगारांना 'अच्छे दिन', निवडणुकीच्या प्रचारासाठी मजूर झाले पगारी कार्यकर्ते

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 10 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील कामगारांना 'अच्छे दिन' आले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मजूर पगारी कार्यकर्ते झाले आहे.आपली रॅली मोठी दिसावी, म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार प्रयत्न करत आहे. यासाठी चक्क भाड्याने कार्यकर्ते बोलावले जात आहेत. दिवसभर मोलमजुरी करून जेवढा पैसा मिळत नाही तेवढा दोन तासांच्या प्रचार रॅलीमध्ये मिळत असल्याचे काही कामगारांनी सांगितले. यामुळे नेहमी शेकडो कामगारांनी भरलेला शहरातील शाहगंज येथील कामगार चौक ओस पडला आहे.

सध्या महराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे. मोठ-मोठ्या सभा, रॅली निघत आहेत. मात्र, या रॅली आणि सभेमध्ये अंगावर रूमाल आणि हातात झेंडा घेऊन येणारे बहुतांश कार्यकर्ते हे भाड्याने आणले जाणारे मजूर आहेत. औरंगाबादेत सध्या भाड्याच्या कार्यकर्त्याचा ट्रेंड सुरू आहे.

महिला असल्यास 250 ते 400 रुपये आणि पुरुष असल्यास 300 ते 500 रुपये प्रत्येक रॅली, सभा असा दर सध्या सुरू आहे. शिवाय हॉटेलमध्ये जेवणही कामगारांना दिले जात आहे.

औरंगाबाद शहरातील कामगारांसाठी प्रसिद्ध असलेला शाहगंज येथील कामगार चौकात रोज 500 ते 600 कामगार सकाळपासून कामाच्या शोधत बसलेले असतात. मात्र, निवडणुका जाहीर झाल्यापासून कामकार चौक ओस पडला आहे. दिवसभराचे काम करून जेवढे पैशे मिळतात, तेवढे एका प्रचारसभेत दोन तासांत मिळत असल्याने कामगार उमेदवारांच्या प्रचाराला जात आहेत. यामुळे निवडणुकीच्या काळात या मजुरांना 'अच्छे दिन' आले आहेत.

Loading...

परळीत मला भीती वाटते, पंकजा मुंडेंचं मोठं विधान, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...