Hot Seat : बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात अशी पडली संघर्षाची ठिणगी

काका-पुतण्याची लढत असलेल्या बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी जाहीर सभेत विकासाचा पाडा वाचत राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 07:48 PM IST

Hot Seat : बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात अशी पडली संघर्षाची ठिणगी

बीड,3 ऑक्टोबर: काका मला वाचवा.. ही काका आणि पुतण्यातील हा संघर्ष आपण पेशवाईत पाहिला आहे. बीड जिल्हा देखील या संघर्षाला सुटलेला नाही. गेवराईत बदामराव पंडितविरुद्ध अमरसिंह पंडित, परळीत लोकनेते गोपीनाथ मुंडेविरुद्ध धनंजय मुंडे नंतर तर आता बीडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जयदत्त क्षीरसागरविरुद्ध संदीप क्षीरसागर असा सत्तासंघर्ष समोर आला आहे. या काका-पुतण्याच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काका-पुतण्याची लढत असलेल्या बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी जाहीर सभेत विकासाचा पाडा वाचत राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. यावेळी व्यासपीठ, नगराध्यक्ष डॉ.भारत भूषण क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख, सचिन मुलूक, माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप व इतर सेनेचे स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती. बीड विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅली काढून माळीवेस, कारंजा रोड, मार्गे छत्रपती शिवाजी चौक, माने कॉम्प्लेक्स मैदानात सभा झाली.

विधानसभा निवडणुकीत काका-पुतणे आमने सामने येणार आहेत. काका-पुतण्याच्या लढतीकडे राज्याचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. त्या सर्व आरोपांचे खंडन करत जयदत्त यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. विधानसभेच्या तोंडावर पुतणे संदीप यांनी नगराध्यक्ष असलेले डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केलेल्या विकास कामावर बॅनरबाजी करून सवाल उपस्थित केले आहेत. संदीप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर काका जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेकडून लढणार असून एकंदर काका-पुतण्यातील चुरशीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

अशी पडली संघर्षाची ठिणगी..

बीडमध्येही संघर्षाची ठिणगी बीड पालिकेच्या निवडणुकीत क्षीरसागर काका पुतण्यात सत्ता संघर्ष वाढला आहे. रवींद्र क्षीरसागर यांना नगराध्यक्ष करावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु त्याला सहमती न मिळाल्याने पालिकेच्या निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना विकास आघाडी स्थापन करत 30 नगरसेवक निवडून आणले. राष्ट्रवादीमध्ये आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे पक्षातील नेत्यांकडूनच खच्चीकरण होऊन पुतणे संदीप यांना बळ मिळू लागल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करता भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार करत निवडून आणले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले.

Loading...

VIDEO:नाथाभाऊ हे चुकीचं आहे, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 07:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...