दलित, मुस्लिम, ख्रिश्चन मतदारांना पैसे देऊन घेतले जातेय मतदान कार्ड!

दलित, मुस्लिम, ख्रिश्चन मतदारांना पैसे देऊन घेतले जातेय मतदान कार्ड!

मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना काँग्रेस उमेदवार कैलास गोरंटयाल यांनी गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:

विजय कमळे पाटील,(प्रतिनिधी)

जालना,17 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना काँग्रेस उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी गंभीर आरोप केला आहे. मला विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचलं आहे. शहरातील दलित, मुस्लिम, ख्रिश्चन मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांना पैसे देऊन त्यांचे मतदान कार्ड गोळा केले जात असल्याचा गंभीर आरोप कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

कैलास गोरंट्याल हे जालन्यातील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही गोरंट्याल यांनी म्हटले आहे. विरोधक निवडणुकीच्या आधी शहरातील मतदारांना पैसे वाटून त्यांच्या हाताच्या बोटावर शाही लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवले जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून काँग्रेसचे कार्यकर्ते देखील शहरात गस्त घालत असल्याचे कैलास गोरंटयाल यांनी सांगितले.

चुरशीची लढत...

जालना विधानसभा मतदारसंघातही एक चुरशी निवडणूक पाहायला मिळणार आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे अर्जून खोतकर यांनी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता. यावेळीही अर्जून खोतकर आणि गोरंट्याल यांच्यात काट्याची लढत होत आहे. गेल्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र असल्याने मतविभाजन झाले होते. यावेळी युती आघाडी असली, तरी भाजप-शिवसेनेला किती सहकार्य करते यावर निकाल अवलंबून आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत जालना जिल्ह्यातील पाच जागांपैकी भाजपने तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती.

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचा पलटवार, पाहा काय म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 04:15 PM IST

ताज्या बातम्या