पंकजा मुंडेंनी बीडमध्ये फिरवली जादूची कांडी, धनंजय मुंडेंना बसला धक्का

पंकजा मुंडेंनी बीडमध्ये फिरवली जादूची कांडी, धनंजय मुंडेंना बसला धक्का

कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी. मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड, 5 ऑक्टोबर: राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये जादूची कांडी फिरवून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का दिला आहे. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी. मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे परळी तालुका कॉंग्रेसचे विसर्जन करुन भाजपत प्रवेश केल्याचे प्रा.टी.पी. मुंडे यांनी जाहीर केले आहे. प्रा.मुंडे यांनी कॉंग्रेसकडून परळी मतदार संघातून उमेदवारीचा दावा केला होता. मात्र, आघाडीकडून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने टी पी मुंडे नाराज होते. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांनीची बैठक बोलावली या बैठकीत निर्णय घेतला. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे यांची उपस्थित होत्या.

कॉंग्रेसमधील अनेक नेत्याचा प्रवेश भाजपत आपण पहिला असेन पण थेट कॉंग्रेस पक्षाचे विसर्जन करुन भाजपत प्रवेश पहिल्यांदा होतोय. परळी तालुका कॉंग्रेसचे विसर्जन करुन पंकजा मुंडेंनाच्या पाठीशी खंबीर साथ देणार असल्याचे टी.पी. मुंडे यांनी यावेळी सांगितले. टी.पी.मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात त्यांनी 1999 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 45 हजार मते मिळाले होते. 2009 ला त्यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 65 हजार मते मिळाले होते. 2014 ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी 20 हजार मत घेतली होती. नगर पालिका, बाजार समिती जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहेत. यामुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का समजला जात आहे.

टी.पी. मुंडेंनी भाजपमध्ये प्रवेश करताना धनंजय मुंडे यांच्यावर कडाडून टीका केली. धनंजय मुंडेंमुळे भाजप सोडले होते.आता त्यांनी केलेल्या अन्यायामुळे कॉंग्रेस सोडत असल्याचे सांगितले. वारंवार डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत बोलून दाखवली. तसेच येत्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना निवडून देण्यासाठी सर्व यंत्रणा उभी करणार असल्याचे सांगितले. तसेच पंकजा माझी मुलगीच आहे. तिच्या पाठीशी चुलता म्हणून खंबीरपणे उभा राहील असे सांगितले. तालुका कॉंग्रेस पार्टीचे विसर्जन करून काॅग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ज्येष्ठ नेते प्रा.टी.पी.मुंडे यांचा समर्थकांसह भाजपत प्रवेश केला आहे. यामुळे परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडेंचे पारडे जड झाले आहे. तसेच काका आल्याने विजय कोणी रोखणार नाही, मी राज्य सांभाळायला मोकळी आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

प्रा.टी.पी मुंडे यांची धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका धनंजय मुंडे नी मुंडे साहेबांच्या लेकीला त्रास दिला राजकारणात पाय ओढण्याचे काम केले. ज्या मुंडे साहेबांनी तुम्हाला सर्व काही दिले त्यांच्याशीच गद्दारी केली. पंकजा माझी लेक, चुलता म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.काॅग्रेस पक्ष संपविण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले. गुंडगिरी आणि दबावाला बळी पडू नका, जशास तसे उत्तर देणार आहे. पंकजा महाराष्ट्राची वाघिण आहे. मुंडे घराण्याची खरी शान आहे. त्यांच्या जादूचा कांडीचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. पंकजा यांचा विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार केल्याचे प्रा.मुंडे यांनी बोलून दाखवला.

पंकजांच्या या भावाने भाजपला ठोकला रामराम...

पंकजा मुंडे यांचे चुलत बंधु रामेश्‍वर मुंडे यांनी गेल्या महिन्यात भाजपला रामराम ठोकला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंकजा मुंडेंवर नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये कार्यकर्त्यांचे कुठेलच काम होत नाही, सातत्याने अन्याय होत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे रामेश्‍वर मुंडे यांनी सांगितले होते.

रामेश्‍वर मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे बंधु व्यंकटराव मुंडे यांचे चिरंजीव आहे. ते पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे होते. मात्र, नाराजी व्यक्त करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मोठा धक्का समजाला जात आहे. परळी शहरातील भाजपची यंत्रणा रामेश्वर मुंडे पाहत होते. यामुळे जवळच्या नात्यातील रामेश्‍वर मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर प्रवेश केल्याने पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासोबत आता मुंडे घराण्यातील एकही भाऊ राजकरणात सोबत राहिलेला नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

VIDEO:निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचं सोशल इंजिनिअरिंग, वेगवेगळ्या समाजाचा पाठिंबा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 05:23 PM IST

ताज्या बातम्या