...ओन्ली इमानदारी, मुख्यमंत्र्यांच्या 'टीम'मधील हा अधिकारी उतरला राजकारणाच्या आखाड्यात

...ओन्ली इमानदारी, मुख्यमंत्र्यांच्या 'टीम'मधील हा अधिकारी उतरला राजकारणाच्या आखाड्यात

'नो टक्केवारी नो गुत्तेदारी, ओन्ली इमानदारी', हे ब्रीद वाक्य घेवून एक प्रशासकीय अधिकारी निवडणूक मैदानात उतरला आहे.

  • Share this:

बीड, 18 सप्टेंबर:'नो टक्केवारी नो गुत्तेदारी, ओन्ली इमानदारी', हे ब्रीद वाक्य घेवून एक प्रशासकीय अधिकारी निवडणूक मैदानात उतरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममधील मुख्यमंत्री सहायता कक्ष प्रमुख तसेच मुख्यमंत्र्यांचे ओएसडी ओम प्रकाश शेटे यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघात दावेदारी दाखवली आहे. त्यांनी सध्या प्रचार दौरे सुरु केले आहेत. शेटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तिकिटांची मागणी केली आहे.

लातूरमधील अभिमन्यू पवार यांना ग्रीन सिग्नल मिळल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ ओमप्रकाश शेटे देखील राजकारणाच्या आखाड्यात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री सहायता कक्ष निधीच्या माध्यमात ओळख मिळवलेले ओमप्रकाश शेटे मूळ माजलगाव मतदार संघातील दिंद्रूडचे रहिवाशी आहेत. गेल्या पाच वर्षांत या भागातील अनेक कामे मार्गी लावल्यामुळे व शासकीय योजनांचा निधी खेचून आणल्याने मतदार संघात चांगली प्रतिमा तयार झाली आहे. या मतदार संघात भाजपकडून उमदेवारी मागणाऱ्यांची भाऊगर्दी झाली आहे. यामध्ये ओमप्रकाश शेटे यांनी माजलगावच्या जागे बाबतीत रस दाखवत थेट रजा टाकून माजलगावमध्ये संपर्क वाढवला आहे. तसेच संवाद दौरे देखील सुरु केले आहेत. यामुळे येत्या निवडणुकीत नेत्यांबरोबर अधिकारी देखील रिंगणात उतरताना दिसत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीचे रणांगण पेटल्याने राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक राजकीय घडामोडीला वेग आला आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेच्या बालेकिल्यात स्वतः लक्ष घातल्याचे दिसत आहे. माजलगाव मतदार संघातून फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी तथा मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. शेटे यांनी गेल्या साडेचार वर्षांत हजारो रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. प्रशासकीय सेवेत यशस्वी कामगिरी केल्यानंतर आता त्यांना विधानसभेचे डोहाळे लागलेत. गेल्या दीड दोन वर्षांपासून ते माजलगाव मतदार संघात संपर्कात असून गेल्या महिनाभरापासून त्यांनी वाडी, वस्ती, तांड्यावर देखील लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत उठबस सुरु केली.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मराठवाड्यात आली तेव्हा शेटे हे या यात्रेत सक्रिय सहभागी होते.औसामधून अभिमन्यू पवार यांना ग्रीनसिग्नल दिल्यानंतर आता ओमप्रकाश शेटे देखील माजलगाव मधून इच्छुक आहेत. यासाठी निवडणुकीच्या मैदानात हबूक ठोकली भाजपाच्या उमेदवारांच्या मुलाखतीत बायोडाटयासह प्रभावी मुलाखत दिल्याची चर्चा आहे. माजलगाव मतदार संघात 18 हजार लोकांना अयोग्याची मदत, 5000 शेतकऱ्यांना बियाणे वाटप, 4000 अपंगांना साहित्य वाटप, अनेक ग्रामपंचायतीना विकास निधी मिळवून दिल्यामुळे संपूर्ण मतदार संघात चांगलाच जम बसवण्याचे काम सुरु आहे.

धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, का तर म्हणे पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

Published by: Sandip Parolekar
First published: September 18, 2019, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading