पंकजा मुंडेचे 'डॉ. प्रीतम' अस्त्र... भावाला दिले आव्हान, पिंजून काढताहेत मतदारसंघ

पंकजा मुंडेचे 'डॉ. प्रीतम' अस्त्र... भावाला दिले आव्हान, पिंजून काढताहेत मतदारसंघ

धनंजय मुंडे यांच्या आरोप प्रत्यारोपांना उत्तर देत पंकजा मुंडेच्या प्रचाराची धुरा प्रीतम मुंडे यांनी हातात घेतली आहे.

  • Share this:

बीड,20 सप्टेंबर: महाराष्ट्रातील हाय होल्टज लढत असलेल्या परळी विधानसभा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ आमनेसामने आहेत. यातच पंकजा मुंडेच्या विजयासाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी परळी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. धनंजय मुंडे यांच्या आरोप प्रत्यारोपांना उत्तर देत पंकजा मुंडेच्या प्रचाराची धुरा प्रीतम मुंडे यांनी हातात घेतली आहे. गावागावात महिलांच्या बचत गटांना प्रत्यक्ष भेट देण्यावर खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी भर दिला आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदाप डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे या तिन्ही बहिणींनी कंबर कसून प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. यावेळी धनंजय मुंडेवर गंभीर आरोप करत जशास तसे उत्तर दिले. वैद्यनाथवर बोट दाखवणारा.. जगमित्र सूतगिरणी, जगमित्र शुगर फॅक्टरीमध्ये मृतांच्या नावावरच्या जमिनी लाटल्या. त्या शेतकऱ्यांना आगोदर न्याय द्या, असा सवाल करत प्रीतम मुंडेंनी गंभीर आरोप केले आहेत.

परळी मतदार संघात पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून केलेली विकास कामे केली जेवढा विकास गेल्या पंधरा वर्षांत केला नाही. तो ताईंनी केवळ पाच वर्षांत केला, असा प्रीतम मुंडे दावा केला आहे. खासदारकींच्या निवडणुकीत पंकजा मुंडेनी जादूची कांडी फिरवत प्रीतम मुंडेंना ऐतिहसिक विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आता प्रीतम मुंडे देखील निवडणुकीत आगोदर प्रचाराची तालीम सुरु केली. दिवसरात्र एक करुन 32 गावे दिवसांला पिंजून काढत आहेत. यामुळे धनंजय मुंडेच्या कडव्या आवाहनाला आता पंकजा मुंडेंनी 'डॉ. प्रीतम अस्त्र' सक्रिय केले आहे. यशश्री मुंडे या अद्याप या प्रचार मोहिमेत उतरल्या नाहीत. मात्र, आचारसंहिता लागल्यानंतर त्याही मैदानात उतरणार आहेत. यामुळे येत्या निवडणुकीत तिन्ही बहिणीं मिळून धनंजय मुंडेना आव्हान देत विजयश्री मिळवण्यासाठी कामाला लागल्या आहेत.

पंकजा मुंडे यांनी परळीत विकास कामाच्या उद्घाटनाचा धडका लावला आहे. मुलभूत सेवा सूविधा, रस्ते, पाणी, शिक्षण, आणि आरोग्य याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी यशस्वी पाऊल टाकत.. बचतगटाची चळवळ सक्रिय केली. परळी तालुक्यातील गाव रस्ते, ग्रामपंचायत इमारती, शाळा, अंगणवाडी, या सर्वच बाबतीत आपण विकास केल्याचा दावा प्रीतम मुंडें करत आहेत. 133 कोटीचा ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर विकास आरखडा तयार केला असून या कामाचे भूमीपूजन करण्यात आल्याचे प्रीतम मुंडे यांनी सांगितल.

मी विकास काय असतो ते करुन दाखवले आहे. परळीची जनता हुशार आहे. काम करणाऱ्याच्या पाठीशी राहील असे जाहीर कार्यक्रमात सांगितले. तसेच परळी शहर धनंजय मुंडेच्या ताब्यात आहेत. यात काय विकासाचा दिवा लावला. कोट्यवधीची शहराला पाणी पुरवठा योजना लाटून खाल्ली, असा गंभीर आरोप केला.

Loading...

CCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...