पवार आणि पाटील कुटुंबातील वाद चिघळला, सुप्रियांच्या टीकेवर पद्मसिंहांचा पलटवार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे निकटवर्तीय राहिलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबातील वाद चांगलाच चिघळला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2019 02:55 PM IST

पवार आणि पाटील कुटुंबातील वाद चिघळला, सुप्रियांच्या टीकेवर पद्मसिंहांचा पलटवार

बालाजी निरफळ, (प्रतिनिधी)

उस्मानाबाद, 14 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे निकटवर्तीय राहिलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबातील वाद चांगलाच चिघळला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर डॉ.पद्मसिंह पाटील यांचे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पक्षांतर्गत कुरघोड्यांना पायबंद घातला असता तर पक्षावर ही वेळ आली नसती, असा टोला

डॉ.पाटील यांनी लगावला आहे.

काय म्हणाले पद्मसिंह पाटील...

'सुप्रिया मला मुलीसारख्या आहेत. त्यांनी माझी काळजी व्यक्त करताना वस्तुस्थितीला धरून मत व्यक्त केले असते तर आनंद वाटला असता. राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी मिळून जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पक्षबदलाचा आग्रह धरला होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून राणांच्या पक्षांतराचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी मी स्वत: तुळजापूरपर्यंत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना आशिर्वाद दिले होते. तत्पूर्वी 31 ऑगस्टला झालेल्या मेळाव्यात मी स्वत: राणांना राजकीय वाटचालीस आशीर्वाद दिले होते व 'राणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा' असे आवाहन समर्थकांना केले होते. 2014 पासून प्रकृतीच्या कारणामुळे मी राजकारणात सक्रीय नाही. त्यामुळे माझा पक्षप्रवेशाचा प्रश्नच नव्हता. सुप्रियांना देखील हे माहीत आहे, असे असताना त्यांनी माझा पक्षप्रवेश रोखण्याबाबतचे विधान करणे खेदकारक आहे. सुप्रियांनी माझ्यापेक्षा पक्षातील नेत्यांची काळजी घेतली असती, पक्षांतर्गत कुरघोड्यांना वेळीच पायबंद घातला असता तर पक्षावर कदाचित आज ही वेळ आली नसती, असे पद्मसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Loading...

सुप्रिया सुळेंनी केले होते हे वक्तव्य...

सुप्रिया सुळे यांनी डॉ. पद्मसिंह पाटील व राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशावर खोचक टीका केली होती. वडिलांना अर्ध्या रस्त्यावर सोडून राणा पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. तर डॉ. पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना भाजपने प्रवेश नाकारल्याचे वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केले होते.

SPECIAL REPORT: राजे मंडळींनी राष्ट्रवादीची साथ सोडली; शरद पवार एकटे पडले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...