परळीत नरेंद्र मोदी काय डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी विजय माझाच- धनंजय मुंडे

परळीत नरेंद्र मोदी काय डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी विजय माझाच- धनंजय मुंडे

परळी मतदार संघात भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जी रॅली पहिली त्याचा धसका घेतला म्हणून बड्या नेत्यांना येऊन प्रचारासाठी येत आहेत

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,13 ऑक्टोबर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परळी मतदार संघात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. तेच काय पण भाजपने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आणले तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले. परळी मतदार संघातील घाटनांदूर येथील प्रचार सभेला धनंजय मुंडे यांनी संबोधित केले.

परळी मतदारसंघात 'काटे की टक्कर' असलेल्या मुंडे बंधू-भगिनीमधील लक्ष वेधी लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. यात निवडणूक प्रचारात एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना एकही संधी सोडत नाहीत. महिला व बालकल्याण मंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी 17 ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. यावर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले की, भाजप पराभवाच्या भीतीने मोठ-मोठे नेते आणत आहे. पण भारतातील नेत्यांबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी परळीत सभेला आले तरी माझाच विजय निश्चित आहे, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. त्या बरोबरच परळी मतदार संघात भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जी रॅली पहिली त्याचा धसका घेतला म्हणून बड्या नेत्यांना येऊन प्रचारासाठी येत आहेत, असाही टोला त्यांनी लगावला.

पंकजा मुंडेंना धक्का.. 'माधव'चा हा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या माळी-धनगर-वंजारी या 'माधव; समीकरणातील सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का समजला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसोबत असलेले कल्याणराव आखाडे लोकसभा निवडणुकीपासून नाराज होते. भाजपसोबत एकनिष्ठ काम करून सत्तेचा वाटा दिला नाही, वारंवार डावलले. यामुळे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर नाराज होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ओबीसी मतांचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

स्व.गोपीनाथ मुंडेंसोबत भाजपाची महत्त्वाची ओबीसी संघटना म्हणून ओळख असलेल्या सावता परिषदेचा माळी समाजात मोठा दबदबा आहे. कल्याणराव आखाडे हे मागील अनेक वर्षांपासून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा आणि राज्यभरात काम करीत होते. अरण या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी ते माळी समाज बांधवांचा पंकजांच्या उपस्थितीत मोठा मेळावाही घेत असत. बीड जिल्ह्यात वंजारी, धनगर या समाजानंतर माळी समाजाची मोठी मते आहेत. काही दिवसापूर्वी आखाडे यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली होती. याच भेटीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार सावता परिषद भाजपसोबत काडीमोड करून शरद पवार यांच्या उपस्थितीत गेवराईमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यात सावता परिषदेची मोठी ताकद आहे.

माळी समाजाचे एवढं मोठं संघटन असतानाही आमची सत्ताधार्‍यांनी उपेक्षा केली. आपला विचार होताना दिसला नाही. माळी समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार हे आश्वासक वाटल्याने आपण हा प्रवेश केल्याचे कल्याणराव आखाडे यांनी सांगितले आहे.

VIDEO:पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 03:38 PM IST

ताज्या बातम्या