धनंजय मुंडेंनी बाप्पाला घातलं हे साकडं, सपत्नीक केली गणेशाची प्राणप्रतिष्ठाना

धनंजय मुंडेंनी बाप्पाला घातलं हे साकडं, सपत्नीक केली गणेशाची प्राणप्रतिष्ठाना

निम्मा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे, शेतकरी संकटात आहेत, सर्व सामान्य माणसाच्या जीवनातील संकटे, विघ्नहर्त्याने दूर करावे, अशी विनम्र प्रार्थना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बाप्पाकडे केली आहे.

  • Share this:

बीड, 3 सप्टेंबर:महाराष्ट्रात सध्या राजकीय सत्ताधाऱ्याकडून राजकीय भ्रष्टचार सुरू केला आहे तो थांबवा? तसेच बाप्पांनी सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी. निम्मा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे, शेतकरी संकटात आहेत, सर्व सामान्य माणसाच्या जीवनातील संकटे, विघ्नहर्त्याने दूर करावे, अशी विनम्र प्रार्थना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बाप्पाकडे केली आहे. तसेच सरकारला सदबुद्धी देवो असं साकडं घालत देशात प्रचंड आर्थिक मंदी आहे. या सरकारमधील मंत्र्यांना ही आर्थिक मंदी दूर करता येणार नाही, त्यामुळे बाप्पांनी आर्थिक मंदी दूर करावे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले आहे.

देशभरात श्रीगणेशाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी देखील परळी येथील त्यांच्या राहत्या घरी गणपती बाप्पांची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना केली. धनंजय मुंडेंनी मुलगी आदिश्रीसह सपत्नीक बाप्पाची आरती केली. या प्रसंगी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. संपूर्ण भारतभर बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रत्येकजण बाप्पाकडे काहींना काही मागत असतो. धनंजय मुंडे यांनी बाप्पाकडे प्रार्थना केली की, सध्या महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचे राजकारण सुरू आहे. मागील 70 वर्षांत कधी नव्हे ते मानवनिर्मित व सरकारनिर्मित महाभयानक आर्थिक संकट उभे ठाकले आहे. सरकारला हे संकट दूर करता येईल, असे वाटत नाही? तर विघ्नहर्ता हे संकट दूर करेल, अशी प्रार्थना धनंजय मुंडे यांनी केली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी गणरायला काय घातलं साकडं?, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 01:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading