बीडमध्ये पैशाचा महापूर.. पैसे वाटताना एकाला रंगेहाथ पकडले, डिक्कीत सापडली रोकड

बीडमध्ये पैशाचा महापूर.. पैसे वाटताना एकाला रंगेहाथ पकडले, डिक्कीत सापडली रोकड

लाखो रूपयाची रक्कम स्कूटीच्या डिक्कीत व वाटलेल्या लोकांची यादी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,19 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रणधुमाळीला चांगलाच जोर चढला आहे. सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात खंडेश्वरी मंदिराजवळ पैसे वाटताना एकास रंगेहाथ पकडले. लाखो रूपयाची रक्कम स्कूटीच्या डिक्कीत व वाटलेल्या लोकांची यादी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. अद्याप हा कुठल्या पक्षाशी संबंधीत आहे, हे समजू शकले नाही. पोलिसांनी या बाबतीत बोलण्यास नकार दिला आहे.

मतदारांना पैसे वाटप करताना सुरेश बनसोडे नामक व्यक्तीस लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. विशेष म्हणजे गाडीच्या डिक्कीत यादी पण सापडली असून यामुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे.

खंडेश्वरी मंदिर परिसरात पैसे वाटप करणाऱ्या सुरेश बनसोडे यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करून या व्यक्तीस ताब्यात देण्यात आले. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा सुरू केला असून या व्यक्तीकडे दोन हजार, पाचशे, शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले.

बीडमध्ये काकाविरुद्ध पुतण्या ही फाईट होत असून काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर पुतण्या संदीप याने आव्हान उभे केले आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभव समोर दिसू लागल्याने पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पैसे वाटणारे आणि घेणारा वर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पैसे कशासाठी वाटले जात होते, हे पोलिस तपासात निष्पन्न होणार आहे. मात्र या घटनेने निवडणुकीत पैसा बाहेर काढायला सुरुवात झाली, अशी चर्चा रंगली आहे. या प्रकारावर पेठ बीड पोलिसांनी बोलण्यास नकार दिला. या कारवाई मुळे शहरातील खंडेश्वरी मंदिराजवळ तणाव पसरला आहे. पुढील तपास निवडणूक अधिकारी करत आहेत.

पक्षाने दिली नाही उमेदवारी, या राजकीय नेत्याच्या घरात सापडलं घबाड

दरम्यान, शुक्रवारी ठाण्यातील एका राजकीय नेत्याच्या घरात कोट्यवधींचे घबाड सापडले होते. ठाणे-घोडबंदर रोडवरील पुष्पांजली रेसिडन्समधील 301 नंबर फ्लॅटमध्ये ही रोकड सापडली. ठाणे क्राईम ब्रॅंच युनिट 1 ने ही कारवाई केली. याप्रकरणी निवडणूक अधिकारी चौकशी करत आहेत. मात्र, हा राजकीय नेता कोण, तो कोणत्या पक्षाचा आहे, याबाबत अद्याप समजू शकले.

सोलापूरला जाणार होती रक्कम..

मिळालेली माहिती अशी की, राजू खरे नामक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एकूण 53 लाख 46 हजार रुपये रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम सोलापूर जिल्ह्यात जाणार होती. मात्र, पक्षाने त्या नेत्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पैसे दुसऱ्या कामकरता सोलापूरला नेले जात होते. सोलापूरमधील तो राजकीय नेता कोण आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

सुप्रिया सुळेंच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती..

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरची निवडणूक विभागाच्या फिरत्या तपासणी पथकाकडून झाडाझडती करण्यात आली. तपासनी केल्यानंतर महालक्ष्मी रेस कोर्सवरून सुप्रिया सुळे हेलिकॉप्टरने रवाना झाल्या.

मुंबईतून 15.5 कोटींची रक्कम जप्त...

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रक्कम प्राप्तीकर विभागाने जप्त केले आहेत. निवडणुकीत मतदारांन आकर्षित करण्यासाठी होणाऱ्या पैशांच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी प्राप्तीकर विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे.

वंचित आघाडीच्या कार्यालयात सापडली होती एवढी रक्कम...

दरम्यान गेल्या आठवड्यात प्राप्तीकर विभागाने वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. अबुल हसन खान यांच्या साकीनाका कार्यालयात 1 हजार 100 रुपये आढळून आले होते. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने दिवसभर आमच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली, असा आरोप वंचित आघाडीकडून करण्यात आला होता. सत्ताधारी भाजप-शिवसेना सूडबुद्धीतून अशी कारवाई करत आहे, असंही वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

VIDEO: अमृता फडणवीसांनी जाहीर केला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचा निकाल, म्हणाल्या...

Published by: Sandip Parolekar
First published: October 19, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading