शिवसेनेचा हा बंडखोर उमेदवार भाजपचा पराभव करून उद्धव ठाकरेंना देणार सरप्राईज

शिवसेनेचा हा बंडखोर उमेदवार भाजपचा पराभव करून उद्धव ठाकरेंना देणार सरप्राईज

बदनापुरात भाजप आमदार नारायण कुचे यांना शिवसेनेच्या बंडखोर नेत्याने आव्हान दिले आहे. नारायण कुचे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चित करण्यासाठी या नेत्याने दंड ठोपटले आहे.

  • Share this:

जालना,4 ऑक्टोबर: बदनापुरात भाजप आमदार नारायण कुचे यांना शिवसेनेच्या बंडखोर नेत्याने आव्हान दिले आहे. नारायण कुचे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चित करण्यासाठी या नेत्याने दंड ठोपटले आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते राजू अहिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बदनापूर मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. पण हा मतदार संघ शिवसेनेसाठी न सुटल्याने या मतदार संघात शिवसेनेचे स्थानिक नेते राजू अहिरे यांनी भाजप उमेदवार नारायण कुचे यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. दरम्यान बदनापूर शहरात शक्तिप्रदर्शन करत राजू अहिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण या मतदार संघातून विजयी होऊन शिवसेना पक्ष प्रमुखांना सरप्राईज देऊ, असा विश्वास अहिरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. जालन्यातील बदनापूर मतदार संघात भाजप आमदार नारायण कुचेंना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोरांनी व्यूहरचना केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुचेंना मिळणारी मते विभाजित करण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते राजू अहिरे यांनी देखील शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

रावसाहेब दानवेंच्या मुलाचे जोरदार शक्तीप्रदर्शन..

जालन्यातील भोकरदन विधानसभा मतदार संघातून भाजप उमेदवार संतोष दानवे यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी संतोष दानवे यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करत विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत संतोष दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यभरात युतीला 225 जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. मतदार संघात केलेल्या कामाच्या बळावर पुत्र संतोष दानवे पुन्हा विजयी होतील, असा दावाही दानवेंनी केला आहे. हजारोंच्या मताधिक्याने पुन्हा विजयी होऊ, असे संतोष दानवे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवसस्थानातून या काढण्यात आलेल्या विशाल मिरवणुकीमुळे रस्ता पूर्णपणे ब्लॉक होऊन वाहतूक ठप्प झाली होती. याचवेळी एक रुग्णवाहिका सायरन वाजवत भोकरदनकडून जालन्याच्या दिशेकडे जात होती. परंतु दानवे यांच्या सूचनेवरून कार्यकर्त्यांनी तात्काळ सदर रुग्णवाहिकेस रस्ता मोकळा करून दिला.

परतुरमधून काँग्रेस उमेदवार सुरेशकुमार जेथलिया रिंगणात...

दुसरीकडे, जालन्यातील परतूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी परतूर शहरात जेथलिया यांनी कार्यकर्त्यांची रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर जेथलिया यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास जेथलिया यांनी व्यक्त केला.

VIDEO:...म्हणून संजय निरुपम काँग्रेसचा प्रचार करणार नाहीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या