बनावट स्वाक्षरी करणं पडलं महागात.. भाजप आमदारांसह पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बनावट स्वाक्षरी करणं पडलं महागात.. भाजप आमदारांसह पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बनावट स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने भाजप आमदारांसह पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

बीड, 12 सप्टेंबर: बनावट स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने भाजप आमदारांसह पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यातील केज मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार संगीता ठोंबरे यानी केजपासून जवळच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी उभारली. या सूतगिरणी मध्ये गणाजी सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्त केले होते. या विरोधात केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र गुन्हा दाखल केला नाही. म्हणून फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणा न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ.विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर फौजदारी संहिता कलम 153(3)अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार संगीता ठोंबरे या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे सूतगिरणी केज'च्या संचालकपदी बोगस स्वाक्षरी करून निवडले असल्याचा आरोप करत तक्रारदार गणपती सोनप्पा कांबळे यांनी याआधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कांबळे यांच्या याचिकेवर केज दिवाणी न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. न्यायालयाने सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ.विजयप्रकाश ठोंबरे व भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल होत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार ठोंबरे यांनी दोन वर्षांपूर्वी केज येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने नवीन सूतगिरणी उभारली आहे. सूतगिरणीचे काम अद्याप सुरू आहे. याच सूतगिरणीवर संचालक म्हणून नेमलेल्या एका व्यक्तीच्या बोगस स्वाक्षऱ्या केल्याचा ठपका आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केज येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद केला जाणार आहे. आमदार संगीता ठोंबरे या केज विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर मोदी लाटेत निवडून आल्या आहेत त्यांचे पती डॉ. विजप्रकाश ठोंबरे हे लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आहेत.

VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार

Published by: Sandip Parolekar
First published: September 12, 2019, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading